Railway Job: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना उत्तर मध्य रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; कसा करता येईल अर्ज ?

Railway Job: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना उत्तर मध्य रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; कसा करता येईल अर्ज ?

Railway Job: जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर खरंच तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. उत्तर मध्य रेल्वेत सध्या भरती सुरु करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. साधारणपणे १५ ते २४ वयोगटातील तरुणांना या पदासाठी अर्ज करता येणार आहे. १० वी पास असणाऱ्या कोणत्याही इच्छुक उमेदवाराला हा अर्ज करता येईल. नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना १५ ऑक्टोबरपर्यंत या पदासाठी अर्ज करण्यात येणार आहे.

कोणत्या पदांसाठी भरती सुरु?
वायरमन, लोहार, अप्रेंटिस पदामध्ये फिटर, वेल्डर,मेकॅनिक, फिटर, सुतार, इलेक्ट्रीशियन, पेंटर, वायरमन, वेल्डर, मेकॅनिक डिझेल, कॉम्प्युटर ऑपरेटर, मेकॅनिक मोटर व्हेईकल अशा एकूण २२ पदांसाठी भरती सुरु आहे. या पदांसाठी १६ सप्टेंबरपासून अर्ज सुरु झाले आहेत. नॉर्थ सेंट्रल रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर उमेदवारांना अर्ज दाखल करण्यात येणार आहे.

पात्रता
-उमेदवाराला मान्यताप्राप्त संस्थेतून दहावी ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संबंधीत ट्रेडमध्ये आयटीआय ची पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे.

-अर्जदाराचे वय हे १५ ते २४ वयोगटातील असणे आवश्यक आहे. SC,ST, OBC साठी पाच वर्षांसाठी वयात सूट असेल.

-उमेदवाराकडून अर्ज करण्यासाठी १०० रुपये अर्जशुक्ल आकारण्यात येणार आहे.

वेतन किती असेल ?
उत्तर मध्य रेल्वेतून होणाऱ्या या भरतीसाठी १८००० ते ५६९०० रुपये पगार असेल असे या भरतीच्या जाहीरातीत सांगण्यात आले आहे. नोकरीबाबतची सर्व माहिती अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी संकेतस्थळावर जाऊन संपूर्ण माहिती वाचावी.

कोकण रेल्वेमध्येही नोकरीची संधी
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (Konkan Railway Corporation Limited) अंतर्गत सुद्धा विविध पदांच्या भरती सुरु आहे. याबाबत अर्ज करण्याची प्रक्रिया सुरूच आहे. निवड झालेलया उमेदवारांना महिना ५०००० रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.

Devendra Fadnavis यांनी कितीही गणितं करू द्या, सगळी गणितं मोडून टाकणार; Manoj Jarange Patil यांचा इशारा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version