Wednesday, July 3, 2024

Latest Posts

NET EXAM : नेटच्या परीक्षापद्धतीसोबत वेळापत्रक बदललं ; रद्द झालेल्या परीक्षा आता ‘या’ तारखेला होणार..

सर्व संबंधित उमेदवारांना कळविण्यात येत आहे की काही अपरिहार्य परिस्थितीमुळे राष्ट्रीय चाचणी संस्था (NTA) च्या काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत/रद्द करण्यात आल्या आहेत. आता, खालील तपशिलांनुसार या परीक्षांच्या ताज्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने UGC-NET जून २०२४ परीक्षा OMR (पेन आणि पेपर) मोडमध्ये १८ जून २०२४ रोजी देशातील विविध शहरांमध्ये दोन शिफ्टमध्ये घेतली गेली होती. १९ जून रोजी यु.जी.सी.नेट परीक्षा रद्द करण्यात येईल असे शिक्षण मंत्रालयाने (Ministry of Education) घोषित केले होते. १८ जून २०२४ रोजी झालेल्या युजीसी नेट परीक्षा रद्द करण्यात आली होती.“१९ जून, २०२४ रोजी, विद्यापीठ अनुदान आयोगाला (UGC) गृह मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (१४ C) च्या राष्ट्रीय सायबर क्राइम थ्रेट ॲनालिटिक्स युनिटकडून परीक्षेवर काही इनपुट मिळाले. हे इनपुट प्रथमदर्शनी सूचित करतात की उपरोक्त परीक्षेच्या अखंडतेशी तडजोड झाली असावी. त्यामुळे ही परीक्षा रद्द होऊन नवीन वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर केले जाईल.” असे अद्यादेशात सांगण्यात आले होते.

 यूजीसी नेटचा पेपर (UGC NET Exam) लीक (Paper Leak) झाल्यामुळे मंगळवारी (१८ जून) रोजी होणारी ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने परिपत्रक काढत ही परीक्षा पुन्हा एकदा नव्याने घेतली जाणार असल्याचा निर्णय जाहीर केला, मात्र तरीही त्या मुद्द्यावरून मोठे वाद निर्माण होत होते. त्यामुळे सध्या होणाऱ्या पेपरफुटीच्या घटना लक्षात घेता केंद्र सरकारने याबाबत मोठी पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान या पुर्नपरीक्षेबाबत नव्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यांची माहिती पुढीलप्रमाणे –

सर्व संबंधित उमेदवारांना कळविण्यात येत आहे की काही अपरिहार्य परिस्थितीमुळे राष्ट्रीय चाचणी संस्था (NTA) च्या काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत/रद्द करण्यात आल्या आहेत. आता, खालील तपशिलांनुसार या परीक्षांच्या ताज्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत:

  • NCET २०२४ : १० जुलै २०२४, संगणक आधारित चाचणी
  • संयुक्त CSIR-UGC NET : २५ ते २७ जुलै २०२४, संगणक आधारित चाचणी
  • UGC NET जून 2024 : २१ ऑगस्ट २०२४ ते ०४ सप्टेंबर २०२४, दरम्यान संगणक आधारित चाचणी

आता ही परीक्षा वेगळ्या पद्धतीने घेण्यात येणार आहे, ज्यामुळे याचे पावित्र्य राखले जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) २८ जून रोजी यूजीसी नेट २०२४ सोबत इतर काही परीक्षांच्या नवीन तारखा जाहीर केल्या. ही परीक्षा आता २१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान पुन्हा घेतली जाईल, असे NTA ने अधिसूचनेत म्हटले आहे. त्याचबरोबर ही परीक्षा यापूर्वी ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली होती. परंतु, ती आता संगणक-आधारित चाचणी (CBT) मोडमध्ये घेतली जाईल, असे देखील अधिसूचनेत म्हटले आहे.

परीक्षेत कोणते नवे विषय येणार ?

विद्यापीठ अनुदान आयोग राष्ट्रीय पात्रता परीक्षेत (युजीसी नेट) आता नव्या विषयाची भर पडणार आहे. डिसेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षेत ‘आपत्ती व्यवस्थापन’ विषयाचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. युजीसीचे सचिव प्रा. मनीष जोशी यांनी या बाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले. सहायक प्राध्यापक पदासाठी, संशोधन पाठ्यवृत्तीसाठी युजीसी नेट परीक्षा वर्षातून जून आणि डिसेंबर अशी दोनवेळा घेतली जाते. यंदापासून पीएच.डी.च्या प्रवेशासाठीही याच परीक्षेचे गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय युजीसीने घेतला आहे. युजीसी नेट परीक्षेत सध्या ८३ विषय उपलब्ध आहेत. त्यात आता आपत्ती व्यवस्थापन विषयाचाही समावेश करण्यात येणार आहे.

एकंदरीतच नेट सोबतच मिळालेल्या माहितीनुसार, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) २८ जून रोजी यूजीसी नेट २०२४ सोबत इतर काही परीक्षांच्या नवीन तारखा जाहीर केल्या आहेत.

हे ही वाचा:

“तिजोरीत खळखळाट, अन् थापांचा सुळसुळाट” असे म्हणत पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस दणाणून सोडला

MPCB ने केली वारकऱ्यांसाठी मोठी घोषणा ; आता इंद्रायणी प्रदूषण मुक्त होणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss