Sunday, July 7, 2024

Latest Posts

सहाय्यक उपनिरीक्षक पदभरती साठी अर्ज करायचा आहे तर, जाणून घ्या संपूर्ण पद्दती..

जे विद्यार्थी या जागेच्या शोधात होते या विद्यार्थ्यांना अधिक जोमाने अभ्यास करण्याची गरज आहे. आता तुमची प्रतीक्षा संपली आहे

बरेच जण CAPF साठी तयारी करत असतील, तर आता तुमच्यासाठी खुश खबर आली आहे. जे विद्यार्थी या जागेच्या शोधात होते या विद्यार्थ्यांना अधिक जोमाने अभ्यास करण्याची गरज आहे. आता तुमची प्रतीक्षा संपली आहे. BSF, CAPF या ठिकाणी विविध जागांची भरती प्रक्रिया सुरु केली आहे. सीमा सुरक्षा दल (CAPF), केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (BSF) सहाय्यक उपनिरीक्षक (Stenographer) आणि हेड कॉन्स्टेबल पदांसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे. सोबतच आसाम रायफल परीक्षा २०२४ मध्ये वैयक्तिक सहाय्यक ( Warrant Officer) आणि हवालदार (Stenographer)पदांचा सुद्धा समावेश आहे.

अर्ज कुठे करावा :

rectt.bsf.giv.in हे संकेतस्थळ ८ जुलै २०२४ रोजी रात्री ११.५९ पर्यंत चालू असेल.

किती पदांसाठी जागा आहेत ?

  • एकूण एक हजार पाचशे सव्वीस पदांची भरती करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. त्यापैकी –
  • कॉन्स्टेबल (Ministry) – १,२८३ स्टेनोग्राफर (ASI) – २४३

शैक्षणिक पात्रता :-

  •  इंटरमिडीएट किंवा सिनिअर सेकंडरी स्कुल (१० + २)
  • मान्यता प्राप्त कोणत्याही शिक्षण मंडळातून (बोर्डातून) बारावी परीक्षा उत्तीर्ण

वयाची मर्यादा :-

उमेदवाराचे वय १ ऑगस्ट २०२४ रोजी १८ ते २५ वर्षांच्या दरम्यान असावे.

परीक्षा शुल्क किती भरावी लागेल ?

  1.  उमेदवाराला १०० रुपये परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक आहे.
  2. महीला उमेदवार आणि अनुसूचित जाती SC, अनूसूचित जमाती (ST) आणि आरक्षण पात्र माझी सैनिकांना यात सूट देण्यात आली आहे.

निवड प्रक्रिया :

हेड कॉन्स्टेबल मिनिस्ट्रीअल, हवालदार आणि सहाय्यक उपनिरीक्षक, लघुलेखक पदांसाठी अर्ज करणाऱ्या विद्यर्थ्यांना तीन टप्प्यांमधून जावे लागणार आहे.

१. शारीरिक चाचणी

२. संगणक – आधारित चाचणी

३. कौशल्य चाचणी

४. दस्तऐवज पडताळणी

५. वैद्यकीय चाचणी

शारीरिक मानक चाचणी (PST) आणि शारिरीक कार्यक्षमता चाचणी (PET) यासाठी पात्र उमेदवारांना CBT साठी उपस्थित राहण्यास बोलावले जाईल.

पेपर कधी व कितीला असेल ?

  •  CBT मध्ये १०० गुणांचे वस्तुनिष्ठ प्रश्न.
  •  १ तास ४० मिनिटे हा परीक्षेचा कालावधी असेल.
  •  या CBT मध्ये हिंदी / इंग्रजी भाषा ,सामान्य बुद्धिमत्ता, संख्यात्मक योग्यता, क्रिटिकल अँटिट्यूड आणि संगणक ज्ञान हे विषय यात समाविष्ठ असतील.
  •  प्रत्येक विषयात एकूण २० गुणांचे २० प्रश्न असतील.

हे ही वाचा:

NEET EXAM: फेरपरीक्षा घेण्यावरून पालक विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी

CAREER निवडताय ? मग ‘या’ गोष्टींचा होईल फायदा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

 

Latest Posts

Don't Miss