spot_img
Wednesday, September 18, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

UGC NET Cut Off 2024: यूजीसी नेट कट ऑफ कसा ठरवतात ? तो कसा पाहायचा जाणून घ्या सविस्तर…

UGC NET Cut Off 2024: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने युजीसी नेटची उत्तर सुची (answer key) त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर ugcnet.nta.ac.in दिली आहे. २१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२४ रोजी युजीसी नेटच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. असिस्टंट प्रोफेसर (AP) आणि ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF) या पदांसाठी उमेदवारांची पात्रता निश्चित करण्यासाठी वर्षातून दोन वेळा ही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा घेतली जात असते.

सर्व विषय आणि श्रेणींसाठी कट-ऑफ २१६ ते १६० च्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. मानसशास्त्र विषयासाठी, जुनियर रिसर्च फेलोशिप आणि सहाय्यक प्राध्यापकांसाठी २०० आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठी १९० इतका कट-ऑफ अंदाजे असेल . सर्व विषयांसाठी श्रेणीनिहाय युजीसीने अपेक्षित कट-ऑफ गुण जाणून घेण्यासाठी ugcnet.nta.ac.in या लिंकवर भेट द्या.

यूजीसी नेट कट ऑफ-
बोर्ड ३०० पैकी कट ऑफ गुणांची गणती करते, किमान उत्तीर्ण गुण श्रेणीनुसार वेगळे असतात. सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी ३०० पैकी किमान १२० गुण मिळणे गरजेचेआहे. ओबीसी, एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि ट्रान्सजेंडर च्या उमेदवारांना पेपर १ आणि २ मध्ये एकत्रित ३०० पैकी कमीतकमी १०५ गुण मिळविणे आवश्यक आहे.

प्रवर्ग- यूजीसी नेट किमान पात्रता गुण
जनरल (यूआर)/ ईडब्ल्यूएस- ४० टक्के
एससी/एसटी/ओबीसी/पीडब्ल्यूडी/थर्ड जेंडर- ३५ टक्के

यूजीसी नेट कट ऑफ कसा ठरवला जातो?
-NTA नियमानुसार परीक्षेस बसलेल्या एकूण उमेदवारांपैकी ६% उमेदवार पात्र ठरवते.
-भारत सरकारच्या आरक्षण धोरणानुसार उमेदवारांना एकूण स्लॉट वितरित केले जातात.
-जेआरएफ आणि सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी पात्र होण्याकरिता उमेदवारांनी दोन्ही पेपर देणे आवश्यक आहे. -सामान्य / अनारक्षित प्रवर्गासाठी कमीतकमी ४० टक्के आणि राखीव प्रवर्गासाठी (एससी, एसटी, ओबीसी (नॉन-क्रीमी लेयर), पीडब्ल्यूडी आणि ट्रान्सजेंडरसाठी ३५% एकूण गुण मिळविणे आवश्यक आहे.

यूजीसी नेट कट ऑफ कसा पाहायचा?
-युजीसी नेटच्या ugcnet.nta.ac.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या आणि होमपेजवर रिझल्ट लिंक शोधावी.
-यूजीसी नेट कट ऑफ आणि डिसेंबर २०२४ चा निकाल’ या लिंकवर क्लिक करावे. नवीन टॅबमध्ये पीडीएफ दिसेल.
-आपले नाव किंवा रोल नंबर शोधण्यासाठी सीटीआरएल + एफ क्लिक करा.
-जर तुमचे नाव यादीत असेल आणि तुम्हाला पात्रतेपेक्षा जास्त गुण मिळाले असतील तर तुम्ही भरती प्रक्रियेत पुढे जाण्यास पात्र असाल तर ते डाऊनलोड करून ठेवा.

हे ही वाचा:

Mukhyamantri Yojana doot साठी अर्ज करण्याची मुदत वाढली, आता ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

यंदा शिवाजी पार्कवर कोणाचा दसरा मेळावा होणार? शिंदे गटाचा मेळावा दुसरीकडे घेण्याचे संकेत ?

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss