spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Mukhyamantri Yojana doot व्हायचंय? पण अर्ज कसा करायचा आणि कधीपर्यंत करायचा?

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत (DGIPR) मुख्यमंत्री योजनादूत (Mukhyamantri Yojana doot) उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील. शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत (Mukhyamantri Yojana doot) उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? 

मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज (Online Form), आधार कार्ड (Aadhar Card), पदवी उत्तीर्ण (Graduation Certificate) असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ., अधिवासाचा दाखला (Domicile Certificate), (सक्षम यंत्रणेने दिलेला), उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो (Passport Size Phhoto), हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे.

नियम व अटी कोणत्या? 

१३ सप्टेंबर २०२४ पर्यंत इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान (Computer Knowledge) असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल (Smart Phone) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.

हे ही वाचा:

नागपूर मिहान प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यास तातडीने पाऊले उचलण्याचे CM Eknath Shinde यांचे निर्देश

अमित शाहांच्या दौऱ्यात अजित पवार अनुपस्थित…

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss