कलर्स मराठी नव्या मालिकांसोबत प्रेक्षकांच्या भेटीला, नवीन वर्षात होणार धमाल मनोरंजन

कलर्स मराठी वाहिनी (colors marathi ) अनेक वर्षांपासून नवनव्या मालिकांच्या मेजवानीने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. भाग्य दिले तु मला, बाळुमामाच्या नावानं चांगभलं, या मालिकांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे.

कलर्स मराठी नव्या मालिकांसोबत प्रेक्षकांच्या भेटीला, नवीन वर्षात होणार धमाल मनोरंजन

कलर्स मराठी वाहिनी (colors marathi ) अनेक वर्षांपासून नवनव्या मालिकांच्या मेजवानीने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. भाग्य दिले तु मला, बाळुमामाच्या नावानं चांगभलं, या मालिकांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. चाहत्यांना मालिकेतील पात्र लक्षात असतात. अश्या वेगवेगळ्या गोष्टींचा संकल्प घेऊन कलर्स वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. नेहमी काहीतरी भन्नाट आणि वेगळं करण्याचा प्रयत्न कलर्स मराठी वाहिनीचा असतो. असाच नाव वर्षात नवीन मनोरंजन घेऊन म्हणजेच २ नवीन मालिका घेऊन कलर्स मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज आहे. रामा राघव आणि पिरतीचा वानवा उरी पेटला या दोन मालिका घेऊन कलर्स मराठीने नविनवर्षात पदार्पण केले आहे.

विशेष म्हणजे दोन्ही मालिका या प्रेमावर आधारित आहेत. रमा राघव (rama raghav) चा नुकताच टिझर प्रदर्शित झाला आहे. हा टिझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय. या मालिकेत ऐश्वर्या शेटे (aishwarya shete ) ही बोल्ड आणि थोडीशी उध्दट भूमिका साकारणार आहे. ऐश्वर्याने फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत काम केले आहे. तर निखिल दामले (nikhil damle ) हा प्रमुख अभिनेत्याच्या भूमिकेत आहे. निखिलची भूमिका अगदी सोज्वळ अशी दाखवली आहे. निखिलने या आधी सुफळ संपूर्ण या मालिकेत काम केलं आहे. दोघांच्या जोडीला बघण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.

या वाहिनीवरील दुसरी प्रदर्शित होणारी मालिका म्हणजे पिरतीचा वनवा उरी पेटला. या मालिकेची गोष्ट भन्नाट आहे. एकीकडे स्पष्ट व्यक्त , स्वतः च आपलं वेगळं अस्तित्व असणारी आणि दुसरीकडे शांत स्वभावाचा वेगळ्या विचारांचा मुलगा जेव्हा तिच्या आयुष्यात येतो तेव्हा वेगळाच वनवा नायिकेच्या आयुष्यात पेटतो. मालिकेत सावीची भूमिका रसिका वखारकर (Rasika Wakharkar) आणि अर्जुनची भूमिका इंद्रनील कामत ( Indranil Kamath) साकारणार आहेत. तसेच मालिकेचे लेखन चिन्मय मांडलेकर यांनी केले आहे. पहिल्या नजरेत आपल्याला जशी एखादी व्यक्ती दिसते ती तशी असेलच असं काही सांगता येत नाही. अगदी तसंच होणार आहे सावी आणि रमाच. कलर्स मराठी घेऊन येत आहे अश्या दोन नायिकांची कथा ज्यांचे स्वभाव, राहणीमान आणि विचार अतिशय वेगळे आहेत.

हे ही वाचा:

कोंबडीच्या पिला मागे धावता धावता पाहा कशी बेबी हत्तीची झाली फजिती

Golden Globe Awardsच्या शर्यतीत दिसणार RRR, ‘या’ दोन विभागांसाठी मिळाले नामांकन

मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा फोन, मुंबईत १९९३ पेक्षाही मोठा धमाका करणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version