‘बिग बॉस १६’ (Bigg Boss 16) हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रमाचा पहिला ‘वीकेंड का वार’ हा काल दि. ८ ऑक्टोबर रोजी पार पडला आहे. पहिल्या वीकेंडला सलमान खान (Salman Khan) स्पर्धकांसोबत वेळ घालवताना दिसून आला आहे. सलमाननं ‘शनिवार का वार’ मध्ये स्पर्धकांना काही सुचना देखील दिल्या. आता या कार्यक्रमाच्या ‘रविवार का वार’ या एपिसोडमध्ये एका सेलिब्रिटीची एन्ट्री होणार आहे. हा सेलिब्रिटी बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांची पोलखोल करताना दिसणार आहे.
View this post on Instagram
नुकताच कलर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक प्रोमो शेअर करण्यात आला. या प्रोमोमध्ये चेहऱ्यावर मास्क घातलेली एक व्यक्ती दिसत आहे. मास्क काढल्यानंतर दिसते की बिग बॉसच्या ‘रविवार का वार’ या एपिसोडमध्ये गायक, अभिनेते, दिग्दर्शक, निर्माता असणारे शेखर सुमन हे एन्ट्री करणार आहेत. बिग बॉसचा ‘रविवार का वार’ हा एपिसोड शेखर सुमन हे होस्ट करणार आहेत, असा अंदाज प्रोमो पाहून लावला जाऊ शकतो. या एपिसोडमध्ये स्पर्धांकाना काही टास्क देऊ शकतात. आता शेखर सुमन यांची एन्ट्री झाल्यानं बिग बॉसच्या घरात अडचणी निर्माण होतील की नाही? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
शेखर सुमन हे एक सुप्रसिद्ध कॉमेडियन, होस्ट आणि अँकर आहेत. हा शोमध्ये एक नवीन ट्विस्ट आहे जो कोणीही येताना दिसला नाही. रविवारी काय होईल हे खरे रहस्य आहे ते उलगडेल. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या प्रोमोला कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘मुव्ह अँड शेक विथ शेखर सुमनमध्ये सर्व स्पर्धकांच्या चेहऱ्यावरील मुखवटे काढले जाणार.’
हे ही वाचा:
संपलेल्या पक्षावर आम्ही बोलत नाही; ठाकरे गटाला मनसेने लगावला टोला
आयोगाच्या निर्णयानंतर सुषमा अंधारेंचे सूचक ट्विट म्हणाल्या, फडणवीसजी तुम्ही जिंकलात…