युजरच्या टीकेला कंगनाने दिले चोख उत्तर

अभिनेत्री कंगना रनौतने (kangna rnaut) नुकताच तिच्या ट्विटर अकाउंटवर (Twitter account) पठाण सिनेमाबद्दल कौतुकास्पद लांब लचक लेख लिहिला आहे. त्यात ती म्हणाली, पठाण सिनेमा हा द्वेषावर प्रेमाचा विजय असल्याचा दावा करते. आपल्या भारत देशात ८० टक्के हिंदू राहतात आणि या देशात पठाण सारखा सिनेमा प्रदर्शित होतो.

युजरच्या टीकेला कंगनाने दिले चोख उत्तर

अभिनेत्री कंगना रनौतने (kangna rnaut) नुकताच तिच्या ट्विटर अकाउंटवर (Twitter account) पठाण सिनेमाबद्दल कौतुकास्पद लांब लचक लेख लिहिला आहे. त्यात ती म्हणाली, पठाण सिनेमा हा द्वेषावर प्रेमाचा विजय असल्याचा दावा करते. आपल्या भारत देशात ८० टक्के हिंदू राहतात आणि या देशात पठाण सारखा सिनेमा प्रदर्शित होतो. ज्या चित्रपटामध्ये आयएसआयएस (isis) आणि पाकिस्तान (pakistan) दाखवला गेला आहे. आणि तो चित्रपट तिकीट खरेदी करून लोक बघत आहेत हे भारताचे प्रेम आहे.

या ट्रोलकराचे नाव नमो यादव (namo yadav) असून तो पेशाने डॉक्टर आहे. कंगनाने त्या ट्रोल करणाऱ्या व्यक्तीस तोडीस तोड उत्तर दिले आहे. ती म्हणाली ‘निमो भाई, मला माझ्या आर्थिक परिस्थितीची फारशी चिंता नाही. फक्त एक चित्रपट बनवण्यासाठी मी माझे घर, माझे कार्यालय, सर्व काही गहाण ठेवले आहे. प्रत्येकजण पैसे कमावतो. असा कोण आहे जो असे पैसे उडवू शकतो’. असे म्हणत कंगणाने युझर चे तोंड बंद केले.

अभिनेत्री कंगना रणौतने (kangna ranaut) तिचा आगामी चित्रपट ‘इमर्जन्सीच्या (Emergency) रॅप-अप पार्टीदरम्यान इमर्जन्सी चित्रपटासाठी गहाण ठेवलेल्या विषयावर प्रतिक्रिया दीली. ती म्हणाली मी ठरवेल ते काम करत राहते पण ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट नाही. मी एका मिनिटात कोणताही निर्णय घेते. पण ‘मालमत्ता गहाण ठेवणे’ माझ्यासाठी खूप मोठा निर्णय होता. कारण शूटिंगच्या (shooting) वेळी बँकेत चकरा मारणे, त्याकाळात आमचे शूटिंग देखील बंद झाले होते. माझ्यासाठी हे थोडे अवघड होते, पण कोणताही धोका पत्करणे हा माझ्यासाठी मोठा निर्णय होता. अश्या रीतीने कंगनाने तिचा चित्रपट यशस्वी रित्या शूट झाल्याची माहिती दिली.

हे ही वाचा:

IND W Vs NZ W आठ गडी राखून भारताचा न्यूझीलंडवर विजय, विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश

राग आल्यामुळे रणबीरने फेकला चाहत्याचा फोन, सोशल मीडियावर चाहत्यांनी केले ट्रोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version