विद्युत जामवालच्या ‘क्रॅक’ चित्रपटात अँक्शनचा तडगा,टीझर प्रदर्शित

बॉलिवूडमधील अँक्शन कमांडो म्हणुन अभिनेता विद्युत जामवालाची ओळख आहे.विद्युत जामवाल त्याच्या चित्रपटांमध्ये सगळे धोकादायक स्टंट स्वत: शूट करत असतो.

विद्युत जामवालच्या ‘क्रॅक’ चित्रपटात अँक्शनचा तडगा,टीझर प्रदर्शित

बॉलिवूडमधील अँक्शन कमांडो म्हणुन अभिनेता विद्युत जामवालाची ओळख आहे.विद्युत जामवाल त्याच्या चित्रपटांमध्ये सगळे धोकादायक स्टंट स्वत: शूट करत असतो.दरम्यान मागील काही दिवसांपासून विद्युत जामवाल त्याच्या आगामी क्रॅक या चित्रपटासाठी चर्चेत आहे.विद्युत आपल्याला नेहमी त्याच्या चित्रपटात चित्तथरारक स्टंट करताना दिसून येतो,त्यामुळे अशा स्टंट बाजी करण्याऱ्या चाहत्यांच्या तो नेहमीच पसंतीस उतरत असतो.

दरम्यान आता विद्युत जामवालच्या ‘क्रॅक’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.यातच आता या चित्रपटाचा हटके टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या सिनेमात विद्युत जामवाल पुन्हा एकदा दमदार अ‍ॅक्शन करताना दिसत आहे.  “जिंदगी तो साला सब के साथ खेलती है… लेकिन असली प्लेयर तो वही है जो जिंदगी के साथ खेले” हा डायलॉग क्रॅक चित्रपटाच्या टीझरमध्ये ऐकू येतो.

1 मिनिट 25 सेकंदाचा टीझर पाहुन प्रेक्षकांना या चित्रपटाची उस्तुकत्ता आहे. या चित्रपटात विद्युत जामवालसोबत सिनेमात नोरा फतेही, अर्जुन रामपाल यांचीही महत्तवाची भुमिका साकारणार आहेत. क्रॅक हा अ‍ॅक्शन सर्व्हायव्हल थ्रिलर आहे, जो भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अनोखा आणि महत्वाचा सिनेमा ठरण्याची शक्यता आहे.मोठ्या किल्ल्यावरुन खाली उडी मारणं, चालत्या ट्रेनसोबत धावणं अशा अनेक गोष्टी पाहायला मिळत आहेत.

आदित्य दत्त दिग्दर्शित  ‘क्रॅक’ 23 फेब्रुवारी 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. विद्युत जामवाल, अब्बास सय्यद आणि प्रांजल खंडाडिया यांनी मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. विद्युत जामवाल या चित्रपटाचा सहनिर्माता देखील आहे. विद्युत जामवाल यांनी 19 एप्रिल 2021 रोजी ‘Action Hero Films’ नावाने त्यांचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले.’कमांडो 3′ नंतर विद्युत आणि दिग्दर्शक आदित्य दत्त ही डायनॅमिक जोडी ‘क्रॅक’ निमित्ताने पुन्हा कमबॅक करत आहे.दरम्यान आता क्रॅकचा जबरदस्त टीझर पाहल्यानंतर सिनेमा तरुणाईला आवडणार यात शंका नाही.त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

हे ही वाचा:

‘हनुमान’ चित्रपटाचा अनोखा ट्रेलर प्रदर्शित,पौराणिक कथेवर भर

‘मल्लिकार्जुन खर्गे हे भारताच्या आघाडीचा पंतप्रधान चेहरा असावेत’, ममता बॅनर्जींचा प्रस्ताव तर…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version