spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

११ वर्ष डेट केल्यानंतर सुनील शेट्टीच्या मुलाचा गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी याचा मुलगा अहान शेट्टी सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. अहान ११ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यानं गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला.

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी याचा मुलगा अहान शेट्टी सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. अहान ११ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यानं गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला.अहान शेट्टी आणि तानिया श्रॉफ गेल्या ११ वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.अहान आणि तानिया यांचं शालेय शिक्षणदेखील एकत्र झालं आहे.त्यावेळी ते एकमेकांचे खास मित्र होते.पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं पण आता त्यांच्या ब्रेकअप चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या एक दीड महिन्यांपूर्वीत अहान आणि तानिया यांचा ब्रेकअप झाल्याचं म्हटलं जात आहे.दरम्यान रिलेशनमध्ये असताना दोघांच्या डेटिंगच्या चर्चाही अनेकदा रंगल्याचं पाहायला मिळालं. पण आता या स्टारकिडचा ब्रेकअप झाल्याचं समोर आलंय. अहान आणि तानियाच्या ब्रेकअपचं कारण सध्या समोर आलं नसलं तरी, दोघांनाही यावर दोघांनही अजुन काही भाष्य केलं नाही.
नेहमीच एकत्र दिसणारं हे कपल बऱ्याच दिवसांपासून एकत्र दिसलं नाही. दोघांनाही एकमेकांसाठी विशेष कोणत्या पोस्ट शेअर केल्या नाही. त्यामुळं दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चेला सुरुवात झाली.

अहान शेट्टी आणि तानिया श्रॉफ हे लोकप्रिय कपल आहे.अहान सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो.तो त्याचे पोस्ट आणि व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असतो.त्याचा चाहता वर्ग देखील बराच मोठा आहे.दोघांचा ब्रेकअप झाल्याने चाहते देखील नाराज झाले आहेत. अहान शेट्टी हा बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता आहे. ‘तडप’ या सिनेमाच्या माध्यमातून 2021 मध्ये त्याने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या सिनेमता अहानसोबत तारा सुतारियादेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसून आली होती. या सिनेमात अहान शेट्टीने काही इंटिमेट सीन्स दिल्यामुळं तो चांगलाच चर्चेत होता. यानंतर मात्र अहान शेट्टी कोणत्या सिनेमात दिसला नाही. येत्या नवीन वर्षात तो एका सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.

दरम्यान तानिया एक लोकप्रिय मॉडेल आहे. एका लोकप्रिय कुटुंबात तानियाचा जन्म झालाय.उद्योगपती जयदेव श्रॉफ आणि रोमिला यांची ती मुलगी आहे.तानिया अनेकदा शेट्टी कुटुंबियासोबत स्पॉट झाली होती. अहानच्या तडप या सिनेमाच्या विशेष स्क्रिनींगलाही ती अहानसोबत आली होती. तर सुनील शेट्टीनंही अनेकदा त्याच्या बोलण्यात तानियाचा उल्लेख केला होता.मात्र आता या दोघांचा ब्रेकअप नक्की कोणत्या कारणांमुळे झाला आहे हे अद्यापही स्पष्ट झालेल नाही.

हे ही वाचा:

चुनाभट्टीतील स्थानिक गुंड पप्पू येरुणकरवर दिवसाढवळ्या गोळीबार

बोनी कपूर आणि लेक जान्हवी कपूर यांनी विकली तब्बल चार फ्लॅट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss