spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बिग बॉस मराठी सीझन ५ च्या घरात यंदा होणार परदेशी गर्ल् ची एन्ट्री, प्रोमोमधून एक खास झलक…

बिग बॉस प्रेमी नेहमीच नव्या सीझन च्या प्रतीक्षेत असतात त्याचप्रमाणे बिग बॉस मराठी सीझन ५ मध्ये सहभागी होणार असलेल्या स्पर्धकांबाबत सदैवच उत्सुकता असते. कोण कोण नवे स्पर्धक असतील यावरून लवकरच पडदा उडणार आहे.

कलर्स मराठी (colors Marathi) वरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम बिग बॉस (Big Boss Marathi Season 5) याची सर्वत्र फारच चर्चा होत असते. सदैव हा कार्यक्रम प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारा ठरतो. बऱ्याच काळानंतर हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या सीझनमध्ये महाराष्ट्राचा लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याच्याकडे सूत्रसंचालनाची जबाबदारी देण्यात आली आहे. या आधीच्या सर्व सीझन मध्ये महेश मांजरेकर(Mahesh Manjrekar) हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन(Hosting) करत होते. परंतु आता ही जबाबदारी अभिनेता रितेश देशमुखकडे देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे १०० दिवसांच्या या खेळात कोण कोण स्पर्धक सहभागी होणार याचेही सर्वाना फार अप्रूप असते.

बिग बॉस मराठीच्या घरात होणार ‘परदेसी गर्ल’ ची एन्ट्री :

या घरात कोण कोणते स्पर्धक असणार याची उत्सुकता सर्वानाच फार असते. पण आता बिग बॉसने अधिकृत इंस्टाग्राम पेज वरून बिग बॉस मराठी चा प्रोमो शेअर करत बिग बॉस च्या घरात एका अप्सरेची एन्ट्री होणार असल्याचे दिसत आहे. या नवीन प्रोमोमुळे बिग बॉस प्रेमींची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. बिग बॉस मराठीच्या घरात पहिल्यांदाच अश्या धमाकेदार आणि ग्लॅमरस अप्सरेची एन्ट्री होणार आहे त्यामुळे ही ‘परदेशी गर्ल’ कोण आहे असेल हे सर्वाना येणाऱ्या ग्रँड प्रीमियर मधेच पाहायला मिळेल.

परदेसी गर्ल जिंकणार का सर्वांची मने :

या नवीन प्रोमो मध्ये या परदेसी गर्ल च्या मनमोहक अदा पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता हि कोण असेल याची सर्व बिग बॉस प्रेमींची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. हि ग्लॅमरस गर्ल घरामध्ये तिची जागा टिकवून ठेवण्यासाठी किती संघर्ष करणार हे पाहायला प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. २८ जुलै रोजी रात्री ९ वाजता बिग बॉस मराठीचा(Big Boss Marathi) ग्रँड प्रीमियर (Grand Premiere) हा कलर्स मराठी(Colors Marathi) वहिनी आणि जिओ सिनेमावर (Jio Cinema) पाहायला मिळेल त्याच प्रमाणे स्पर्धक कोण असतील ह्या बाबत असलेली उत्सुक्ता तेव्हाच समाप्त होईल.

Uddhav Thakeray Birthday: रश्मी-उद्धव ठाकरे यांचे मैत्रीचे रूपांतर प्रेमात कसे झाले? जाणून घ्या हा प्रेमप्रवास…

राज्यातील पूरपरिस्थितीमुळे “धर्मवीर-२” चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले; निर्मात्यांचा अनोखा निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss