‘कांतारा’ चित्रपटाची अवघ्या १८ दिवसात १५० कोटींची कमाई

‘कांतारा’ चित्रपटाची अवघ्या १८ दिवसात १५० कोटींची कमाई

दाक्षिणात्य चित्रपट ‘कांतारा’ला जगभरातून प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रेम आणि प्रतिसाद मिळालेला आहे. सध्याच्या काळात दाक्षिणात्य चित्रपट बॉक्सऑफिसवर राज्य करत आहेत. KGF, KGF २,RRR,पोन्नियिन सेल्वन-१ सारख्या चित्रपटांना जगभरातून खूप मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. तसेच या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर देखील मोठ्या प्रमाणात कमाई केली आहे. या चित्रपटांना दक्षिणेतील प्रेक्षकांचे तसेच, हिंदी प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले असून, आता या यादीत आणखी एका चित्रपटाचा समावेश झाला आहे. KGF आणि KGF २ नंतर,हंबल फिल्म्स चा दुसरा कन्नड चित्रपट ‘कांतारा’ने कर्नाटका बॉक्स ऑफिसवर राज्य करणार आहे.

कांतारा हा चित्रपट कन्नड, हिंदी आणि तेलुगु भाषांमध्ये प्रदर्शित झाला. या व्हर्जनमध्येही ‘कांतारा’ ला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले आणि चित्रपटाने जगभरात जबरदस्त कमाई केली. कांताराची चर्चा जगभर सुरू आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. १०० कोटींनंतर अवघ्या 18 दिवसांत १५० कोटींची कमाई करत ‘कांतारा’ने नवा विक्रम रचला आहे. चित्रपटाची धमाकेदार कमाई पाहून तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, कांतारा लवकरच २०० कोटी क्लबमध्ये सामील होऊ शकेल.

बॉक्स ऑफिस रिपोर्टनुसार, कांतारा या चित्रपटाने कन्नड भाषेत सर्वाधिक कमाई केली आहे. चित्रपटाचे यश पाहून निर्मात्यांनी हा चित्रपट इतर भाषांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या चित्रपटाचे हिंदी, तमिळ आणि तेलुगू व्हर्जन देखील थिएटरमध्ये रिलीज करण्यात आले . तर, आईएमबीडी वरही चित्रपटाने चांगले रेटिंग मिळवले आहे. कन्नड भाषेतील चित्रपट ‘कांतारा’ सध्या सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट IMDb वर सर्वोत्तम रेटिंग मिळवणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. चित्रपटाने आईएमबीडी वर ९.५ रेटिंग मिळवून विक्रम रचला आहे. यापूर्वी हा विक्रम ‘केजीएफ २’च्या नावावर होता. ‘कांतारा’ हा चित्रपट ३० सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. रिलीज होताच या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

 

हेही वाचा : 

NZ vs IND: भारत आणि न्यूझीलंड सराव सामना रद्द

भास्कर जाधवांच्या घरावर दगडफेक, हल्लेखोर पसार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version