२०२२ हे वर्ष ‘या’ जोडप्यांसाठी नक्कीच राहील स्मरणात

२०२२ हे वर्ष ‘या’ जोडप्यांसाठी नक्कीच राहील स्मरणात

Year Ender 2022 : २०२२ हे वर्ष मराठामोळी कलाकारांसाठी खूप खास होते. तसेच मराठी चित्रपट आणि मराठी मालिकांमधील बहुतेक कलाकारांनी लग्नगाठ बांधली. तर आज आम्ही तुम्हाला या बातमीमधून कोणत्या मराठमोळी कलाकारांनी लग्नगाठ बांधली या बद्दल सांगणार आहोत.

 

गायक रोहित राऊत आणि गायिका जुईली जोगळेकर यांनी २३ जानेवारी २०२२ रोजी लग्नगाठ बांधली. तसेच यांनी सोशल मिडीयावर लग्नाचे काही फोटो शेअर केले होते.

 

अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने प्रतीक शाहसोबत १८ मे २०२२ रोजी लग्नगाठ बांधली होतो. तसेच प्रतीक शाहने अनेक हिंदी मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. तेरी मेरी इक जिंदडी, बेहद २, एक दिवाना था या मालिकेचे देखील दिग्दर्शन केले आहे. अभिनेत्री हृता दुर्गुळे ही मराठी चित्रपटाच्या आणि मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येते. मन उडू उडू झाले ही मराठी मालिका बहुतेक प्रेक्षकांची आवडती मालिका ठरली.

 

अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि अभिनेता विराजस कुलकर्णी यांनी ३ मे रोजी लग्नबंधात अडकले. विराजस आणि शिवानीने त्याच्या लग्न बंधनाचे काही क्षण सोशल मिडीयावर शेअर केले होते.

 

अभिनेता “Sumeet Pusavale” आणि “Monica Mahajan” यांचा लग्न सोहळा १४ डिसेंबर रोजी सोलापूरमधील सांगोला येथे मोठ्या थाटामाटात पार पडला.मोनिका ही मूळची जळगाव येथील आहे, आणि ती आयटी सेक्टरमध्ये काम करते, मात्र नोकरीच्या निमित्ताने ती औरंगाबादला राहते. अभिनेता सुमित पुसावळे हे देखील मूळचे औरंगाबाद येथील आहे. तसेच बाळूमामा या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा सुमितला कालांतराने प्रचंड प्रसिद्धी मिळाली.

 

‘तुझ्यात जीव रंगला’ या छोटया पडद्यावरील मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहचलेले राणा आणि पाटकबाई म्हणजेच अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांनी २ डिसेंबर २०२२ रोजी लग्नबंधात अडकले. अक्षया ने लग्नासाठी लाल रंगाची नऊवारी साडी नेसली आहे, आणि हार्दिकने लग्नासाठी पारंपरिक मराठमोळा लूक केला आहे. आणि यांचे सोशल मिडीयावर प्रचंड फोटो व्हायरल झाले होते.

 

Exit mobile version