spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Kaun Banega Crorepati 15 मध्ये २१ वर्षीय जसकरण सिंहने जिंकले १ कोटी

कौन बनेगा करोडपती १५ (Kaun Banega Crorepati 15) हा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा छोट्या पडद्यावरील कार्यक्रम सगळेकडे लोकप्रिय आहे.

कौन बनेगा करोडपती १५ (Kaun Banega Crorepati 15) हा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा छोट्या पडद्यावरील कार्यक्रम सगळेकडे लोकप्रिय आहे. अनेकांना या कार्यक्रमात जाण्याची इच्छा देखील असते. या कार्यक्रमाच्या सिझनमध्ये कोण ना कोण कोरडपती होत असतो. आता नुकताच या कार्यक्रमचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. यामध्ये ‘कौन बनेगा करोडपती १५’ मध्ये पहिला करोडपती भेटला आहे. जसकरण सिंह या २१ वर्षीय तरुणाने कोरडपती होण्याचा मान मिळवला आहे. या प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन म्हणाले, ज्ञानाच्या मंचावर आजवर मी अनेक स्पर्धकांना करोडपती होताना पाहिलं आहे. पण त्या एका प्रश्नावर स्पर्धकांसह तुम्हा प्रेक्षकांच्या छातीत धडधड व्हायला सुरू होते. सात कोटी रुपयांसाठीचा तो प्रश्न असतो. आता सात कोटी रुपयांसाठी हा आहे सोळावा प्रश्न…त्यानंतर स्पर्धक सोळाव्या प्रश्नासाठी सज्ज असलेला दिसत आहे.

कौन बनेगा करोडपती १५ हा विशेष कार्यक्रम ४ आणि ५ सप्टेंबर ला पाहता येणार आहे. सोनी टीव्ही ने प्रोमोला कॅपेंशन लिहिले आहे , कौन बनेगा करोडपती च्या मंचावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं असतं. सात कोटी रुपयांचा प्रश्न विचारल्यावर प्रेक्षकांच्या छातीत धडधड व्हायला सुरू होते”. अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांचे आभार मानले आहेत. तेव्हा ते म्हणाले ‘ “दररोज ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर मी चमत्कार होताना पाहतो. सेटवर येऊन मी शूटिंगला सुरुवात करतो तेव्हा सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि उत्सुकता असते. माझ्यावर विश्वास ठेवा, प्रत्येक टाळी ही खऱ्या आयुष्यात मला खूप काही देत असते. उपस्थित प्रेक्षकांसह टीव्हीवर कार्यक्रम पाहणारे प्रेक्षक माझ्यासाठी सर्वकाही आहेत. तुम्ही माझ्यासोबत नाही असा एकही क्षण नाही.

जसकरण सिंह हा अमृतसर मध्ये राहतो. त्याचे शिक्षण डीएव्ही महाविद्यालयात बीएससी इकोनॉमिक्स (BSc Economics) मध्ये पूर्ण झाले आहे. त्याने या शोमध्ये १ कोटी रुपये जिंकले आहेत. पण जसकरण सिंह हा सात कोटी रुपये जिंकले का? याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. जसकरणच्या यशात त्याचे आई वडील, शिक्षक , महाविद्यलाय यांचा मोठा वाटा आहे. जसकरणचे वडील कॅटरिंगचं काम करतात तर आई गृहिणी आहे.

हे ही वाचा:

Devendra Fadnavis यांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना इशारा, शेतकऱ्यांना त्रास देऊ नका अन्यथा…

‘One Nation One Election’ बाबत केंद्राचे मोठे पाऊल, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

पुण्यातील धक्कादायक घटना रक्षाबंधनला भावाला राखी बांधायला निघाली पण रस्त्यातच जीव गेला…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss