36 Gunn : ४ नोव्हेंबरला ‘३६ गुण’ झळकणार चित्रपटगृहात

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात ‘लग्न’ ही फार महत्वाची गोष्ट असते. दोन व्यक्तींना, कुटुंबांना त्याचबरोबर जबाबदाऱ्यांना जोडणारा हा अत्यंत महत्वाचा काळ असतो. पण त्याचबरोबर लग्न प्रक्रियेत लग्नपत्रिकेलाही तितकेच महत्त्व दिले जाते. मात्र, घरदार, कुटुंब, शिक्षण, नोकरी-व्यवसाय आणि सगळ्यात महत्त्वाचे लग्नपत्रिकेतले ‘३६ गुण’ (36 Gunn) जुळूनही लग्नं यशस्वी होतात का? या प्रश्नांची उत्तरं देणारा समित कक्कड यांनी दिग्दर्शित केलेला ‘३६ गुण’ हा आजच्या पिढीला जवळचा वाटेल असा मराठी चित्रपट येत्या शुक्रवारी ४ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar) आणि अभिनेत्री पूर्वा पवार (Purva Pawar) यांची मुख्य भूमिका असलेल्या ’३६ गुण’ चित्रपटात पुष्कर श्रोत्री, विजय पाटकर, वैभव राज गुप्ता, स्वाती बोवलेकर हे कलाकारसुद्धा दिसणार आहेत.

कुटुंबाच्या आशीर्वादाने, रीतसर पत्रिका बघून लग्न केलेल्या सुधीर आणि क्रियाला मधुचंद्रापासूनच एकमेकांच्या उणीवा जाणवू लागतात. यातूनच त्यांच्या नात्यात खटके उडू लागतात. नेमकं काय चूक? काय बरोबर? या व्दिधा मनःस्थितीत त्यांचं नातं कोणतं वळण घेतं? याची मनोरंजक तितकीच विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे ‘३६ गुण’ हा चित्रपट.

लग्न प्रक्रियेत रितीरिवाज, प्रथा परंपरांबरोबरच दोन व्यक्तींची मतं आणि मन जुळणं किती महत्त्वाचं आहे. हे या चित्रपटातून दाखविण्यात आलं आहे. त्याचबरोबर आजच्या पिढीतील लग्न झालेल्या आणि न झालेल्या तरूण पिढीला केंद्रस्थानी ठेवून या चित्रपटाची कथा रचण्यात आली आहे. लग्न करणाऱ्या दोघांनीही एकमेकांना समजून घेऊन, एकमेकांना साथ देणे अतिशय गरजेचे आहे हे प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.

‘मान मरताब, पगड़ी फेटे रेमंडवाला सूट रे 36 गुण’ हे धमालबाजाचं आणि ‘दुरावा दलदल’ हे अतिशय भावस्पर्शी अशी दोन सुमधुर गाणी या चित्रपटात आहेत. हर्षवर्धन वावरे, जयदीप वैद्य, कीर्ती किल्लेदार यांचा स्वरसाज या गाण्यांना लाभला आहे. मंगेश कांगणे यांच्या गीतांना अजित परब यांचे संगीत लाभले आहे.

हे ही वाचा:

Mumbai Concrete Road : मुंबईतील रस्त्यांचं काँक्रिटीकरण लांबलं

अभिनेता रामचरणचा RC16 चित्रपट रद्द

Patal Lok 2 : क्राइम आणि थ्रिलर सीरिज चाहत्यांसाठी खूशखबर; ‘पाताळ लोक २’ लवकरच भेटीस

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version