36 Gunn : संतोष जुवेकरच्या मुख्य भूमिकेतील नव्या चित्रपटाचे पोस्टर आऊट

मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar) सध्या प्रचंड चर्चेत आहे. संतोषचा आगामी '36 गुण' (36 Gunn) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar) सध्या प्रचंड चर्चेत आहे. संतोषचा आगामी ’36 गुण’ (36 Gunn) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या सिनेमाचे पोस्टर आऊट झाले आहे. ’36 गुण’च्या रोमॅंटिक पोस्टरने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या चित्रपटामध्ये संतोष आणि पूर्वासह पुष्कर श्रोत्री, विजय पाटकर, वैभव राज गुप्ता, स्वाती बोवलेकर हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ’36 गुण’ हा सिनेमा येत्या ४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ’36 गुण’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा समित कक्कडने सांभाळली आहे. तरुण पिढीच्या दृष्टीकोनातून भारतीय लग्नसंस्थेवर भाष्य करणारा हा मनोरंजक सिनेमा आहे. या सिनेमाचं शूटिंग मुंबई आणि लंडनमध्ये पार पडलं आहे. आतापर्यंत न पाहिलेले लंडन आणि वेगळा विषय ’36 गुण’ या सिनेमात मांडण्यात आला आहे.

घरदारं बघून चहा पोह्यांचा रीतसर कार्यक्रम करून, देवा ब्राह्मणांच्या साक्षीने आणि थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने विवाह झालेले, सुधीर आणि क्रिया त्यांचा मधुचंद्र लंडनला करायचा ठरवतात आणि तिथे पोहचल्यावर मात्र त्यांना एकमेकांमध्ये दिसणाऱ्या गुण-अवगुणांची, आपआपसातील वेगळेपणाची जाणीव यावर ’36 गुण’ चित्रपट भाष्य करतो.

हे ही वाचा:

Ram Setu Teaser: राम सेतूच्या धमाकेदार टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

नवरात्रीच्या मुहूर्तावर गुलाम नबी आझादांनी केली नव्या पक्षाची घोषणा, ‘हे’ असणार पक्षाचे नाव

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version