spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शशांक केतकरचा एक मोठा आरोप, प्रसिद्ध मराठी चित्रपटाच्या निर्मात्याने थकवले पैसे…

अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) हा मराठी मनोरंजन विश्वातला लोकप्रिय अभिनेता आहे. शशांकने आजवर अनेक सिनेमा, मालिका, नाटक तसेच वेबसिरीजमधुन दमदार भुमिका साकारल्या.

अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) हा मराठी मनोरंजन विश्वातला लोकप्रिय अभिनेता आहे. शशांकने आजवर अनेक सिनेमा, मालिका, नाटक तसेच वेबसिरीजमधुन दमदार भुमिका साकारल्या. शशांक सोशल मिडीयावर विविध सामाजिक अन् राजकीय विषयांवर त्याची परखड मतं शेअर करत असतो. शशांकने नुकतीच एक पोस्ट केलीय. ज्यामुळे तो चर्चेत आलाय. एका मराठी निर्मात्याने (Marathi producer) पैशांची थकबाकी केल्याचा गंभीर आरोप शशांकने केलाय.

शशांकने सोशल मिडीयावर पोस्ट करुन त्याचा संताप व्यक्त केलाय. शशांक लिहीतो.. “मला आणखी एका चीट प्रोडक्शन हाऊससोबत काम करण्याचा विशेषाधिकार मिळाला. ज्याने मला माझ्या कामासाठी X, xx, xxx लाख रुपये देण्याचे वचन दिले जे मी त्यांच्या अपेक्षेनुसार पूर्ण केले आहे…. (डबिंग वगळता) बरेच महिने झाले मी त्या चीट प्रोडक्शन हाऊसचा पाठपुरावा करत आहे आणि ते लोक मला प्रत्येक वेळी लंगडे बहाणे देत आहेत.” शशांक शेवटी लिहितो, “एक खास मराठी चित्रपट आहे ज्यामध्ये इंडस्ट्रीतील अनेक मोठी नावे आहेत. त्या बड्या स्टार्सना त्यांच्या देय रकमेची वाजवी टक्केवारी आधीच देण्यात आली आहे. पण मला आणि त्याच टीममधील इतर अनेकांना पहिली 20% फी देखील मिळालेली नाही !!!!!!!! माझ्या आणि निर्मात्यांमध्ये घडलेला सर्व तपशील आणि सर्व संवाद मी योग्यवेळ आली की मिडीयासमोर उघड करेल. गंमतीचा भाग हा आहे की एखाद्या कडे Acting skills नसतील तर त्याला आपण actor म्हणत नाही… मग ज्याच्या कडे पैसा नाही त्याला producer का म्हणतो आपण.”

शशांक केतकरने ही पोस्ट करताक्षणी त्याच्या पोस्टखाली त्याच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला. एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे, “हे खूप वाढत चालला आहे, ह्यावर ठोस पाऊल उचललं जात नाही.” दुसरा नेटकरी म्हणतो. “Seriously… हक्काचे पैसे , त्या साठी भांडायच, आणि मनस्ताप पण वसूल करायचा .. वाईट आहे हे.” काही वर्षांपुर्वी निर्माते – दिग्दर्शक मंदार देवस्थळी (Mandar Devsthalli) यांच्यावर शशांक आणि अन्य कलाकारांनी पैसे थकबाकीचा आरोप लावला होता.

हे ही वाचा: 

भारतातील सर्वात महागडा अभिनेता ठरला Rajinikanth!, ‘जेलर’चं मानधन तब्बल…

Asia Cup 2023 IND vs PAK, शाहिन आफ्रिदीने विराट-रोहित दोघांनाही केले बाद, भारताची खराब सुरुवात…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss