spot_img
Tuesday, September 24, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा याची एक मोठी घोषणा…

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील (South Cinema) प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडाचा (Vijay Deverakonda) खुशी (Kushi) हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील (South Cinema) प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडाचा (Vijay Deverakonda) खुशी (Kushi) हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटामधील विजयच्या अभिनयाचं अनेकजण कौतुक करत आहेत. सोमवारी विशाखापट्टणम (Visakhapatnam) येथील एका कार्यक्रमात विजय देवरकोंडानं हजेरी लावली. या कार्यक्रमात विजयनं मोठी घोषणा केली आहे.

नुकताच विशाखापट्टणम येथील कार्यक्रमामधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की विजय म्हणतो, ‘माझा आनंद तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मी १०० कुटुंबांमध्ये एक कोटी रुपयांचे वाटप करण्याची घोषणा करत आहे. १०० कुटुंबांना प्रत्येकी एक लाख रुपये देण्यात येणार आहे.’ व्हिडीओमध्ये विजय हा तेलुगु भाषेत बोलताना दिसत आहे. विजयनं ही घोषणा करताच प्रेक्षक टाळ्यांचा कडकडाट करतात, असं व्हिडीओमध्ये दिसते. फिल्म ट्रेड विश्लेषक मनोबाला विजयबालन (Manobala Vijayabalan) यांनी विजयच्या घोषणेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. विजय हा १०० कुटुंबांना प्रत्येकी एक लाख रुपये येत्या दहा दिवसात देणार आहे, असं म्हटलं जात आहे.

खुशी या चित्रपटानं ओपनिंग-डेला जवळपास १६ कोटींची कमाई केली. या चित्रपटाचं दिग्दर्शन शिव निर्वाण (Shiva Nirvana) यांनी केले आहे. या चित्रपटातील विजय आणि समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटामध्ये विजय आणि समंथा यांच्यासोबतच सचिन खेडेकर, सरन्या पोनवन्नन, मुरली शर्मा, लक्ष्मी जयराम आणि रोहिणी यांच्याही भूमिका आहेत. खुशी हा चित्रपट तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये रिलीज झाला आहे. ३० कोटींच्या बजेटमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे, असं म्हटलं जात आहे.

हे ही वाचा: 

१५ सप्टेंबरला रंगणार ‘फक्त मराठी सिने सन्मान’२०२३, पुरस्कारांची नामांकने जाहीर

जालना लाठीचार्ज प्रकरणी कुणी सूचना दिल्या, यासंदर्भात शरद पवार यांनी उठवला सवाल…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss