‘बिग बॉस १८’ संदर्भात मोठे अपडेट आले समोर, सलमान खान या नवीन थीमसह करणार धमाका…

सलमान खानचा मोस्ट अवेटेड रिॲलिटी शो 'बिग बॉस १८' लवकरच प्रीमियर होणार आहे. शोचा नवीन सीझन कधी प्रसारित केला जाईल याविषयी अद्याप कोणतीही पुष्टी केलेली तारीख समोर आलेली नाही.

‘बिग बॉस १८’ संदर्भात मोठे अपडेट आले समोर, सलमान खान या नवीन थीमसह करणार धमाका…

सलमान खानचा मोस्ट अवेटेड रिॲलिटी शो ‘बिग बॉस १८’ लवकरच प्रीमियर होणार आहे. शोचा नवीन सीझन कधी प्रसारित केला जाईल याविषयी अद्याप कोणतीही पुष्टी केलेली तारीख समोर आलेली नाही. पण ‘बिग बॉस १८’ च्या थीम आणि स्पर्धकांबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. बातमी अशी आहे की सलमान खान नवीन थीमसह नवीन सीझन होस्ट करण्यासाठी सज्ज झाला आहे.

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, सलमान खानने ‘बिग बॉस १८’ चा प्रोमो शूट केला आहे. म्हणजेच यावेळीही सलमानच या शोचा होस्ट असणार हे स्पष्ट झाले आहे. अपडेट असा आहे की रिॲलिटी शोची थीम भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यावर आधारित असणार आहे. ‘बिग बॉस 18’ चे स्पर्धक टाइमलाइनबद्दल बोलताना दिसतील. याशिवाय घराच्या डिझाईन आणि रचनेतही बदल करण्यात येणार आहेत.

रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, ‘बिग बॉस १८’चा होस्ट सलमानने टीमसोबत शूटिंग करताना मजा केली आणि शोचा प्रोमोही लवकरच रिलीज होणार आहे. या महिन्याच्या अखेरीस ‘बिग बॉस १८’ चा पहिला प्रोमो रिलीज होणार असल्याचे बोलले जात आहे. याआधी बिग बॉसचे जुने स्पर्धकही या सीझनमध्ये परतणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण आता रिॲलिटी शोसाठी नवीन कलाकार असतील, ज्याची कास्टिंग सुरू आहे, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. ‘बिग बॉस 18’ च्या स्पर्धकांबाबत अनेक नावे समोर येत आहेत. यामध्ये टीव्ही अभिनेता जान खान, अंजली आनंद, चाहत पांडे, स्प्लिट्सविला फेम कशिश कपूर, दिग्विजय राठी आणि ‘स्त्री 2’मध्ये सरकताची भूमिका करणारा अभिनेता सुनील कुमार यांच्या नावांचा समावेश आहे.

हे ही वाचा:

CM Eknath Shinde यांच्या हस्ते मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे “मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष” लोकार्पण सोहळा संपन्न

महाराष्ट्राचा स्वाभिमान मोदीकडे गहाण ठेवू नका, राज्यात मविआचे सरकार आणा: Mallikarjun Kharge

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version