Satish Kaushik यांच्या मृत्यूप्रकरणाला वेगळं वळण? पोलिसांना सापडली औषधे

गुरुवार दि. ९ मार्च रोजी बॉलीवूडमधील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचा मृत्यू झाला. ते अवघे ६६ वर्षांचे होते.

Satish Kaushik यांच्या मृत्यूप्रकरणाला वेगळं वळण? पोलिसांना सापडली औषधे

गुरुवार दि. ९ मार्च रोजी बॉलीवूडमधील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचा मृत्यू झाला. ते अवघे ६६ वर्षांचे होते. सतीश कौशिक यांना हृदय विकाराच्या झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला. परंतु आता दिल्ली पोलिसांनी पुन्हा एक मोठी अपडेट दिली आहे. सतीश कौशिक यांचा मृत्यू संशयास्पद आहे असा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे.

गुरुवार दि. ९ मार्च रोजी सतीश कौशिक मृत्यू झाला. सतीश कौशिक यांच्या मृत्यूने बॉलीवूडवर मोठी शोककळा पसरली. त्यांच्या अभिनयाने आणि स्वच्छंदी स्वभावाने त्यांचा मित्र आणि चाहता परिवार मोठा होता. गुरुवारी रात्री त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. परंतु आता पुन्हा एकदा त्यांच्या मृत्यूचे नवे गूढ समोर आले आहे.

सतीश कौशिक हे त्यांच्या मृत्युपूर्वी होळीच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या एका पार्टीमध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर रात्री उशिरा त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला. आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण या दरम्यान नेमकं काय घडलं याचा तपास दिल्ली पोलिस करत होते. तसेच गुरुवारी सतीश यांच्या शवविच्छेदन अहवालात त्यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असे नमूद करण्यात आले होते. पण आता हा मृत्यू संशयास्पद असल्याचे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे. सतीश ज्या फार्महाऊसवर होते तिथे काही औषधं दिल्ली पोलिसांना आढळून आली आहेत. पुढील तपास अद्याप सुरू असून आता या मृत्यूचे गूढ अधिकच वाढले आहे.

तसेच दिल्ली पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या टीमनं फार्म हाऊसवर जाऊन तपासणी केली असता पोलिसांना काही ‘आक्षेपार्ह औषधं’ सापडली. यानंतर पोलीस सतीश कौशिक यांच्या सविस्तर पोस्टमॉर्टम आणि व्हिसेरा रिपोर्टची वाट पाहत आहेत. त्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.

Exit mobile version