spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुलगी झाली हो! दीपिका पादुकोण -रणवीर सिंग झाले आई-बाबा, गणेशोत्सवात चिमुकल्या पावलांचे आगमन

बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री दीपिका पादुकोण (Superstar actress Deepika Padukone) ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. परंतु सध्या ती तिच्या प्रेग्नेंसीमुळे चांगलीच चर्चेत होती .

बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री दीपिका पादुकोण (Superstar actress Deepika Padukone) ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. परंतु सध्या ती तिच्या प्रेग्नेंसीमुळे चांगलीच चर्चेत होती . अश्यातच दीपिका -रणवीरने एक आनंदाची बातमी सर्वाना दिली आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. दीपिका-रणवीर आई-बाबा झाले आहेत. बॉलीवूड इंडस्ट्रीबाबत बातम्या देणाऱ्या विरल भयानी याने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर ही बातमी दिली आहे.

गणेश चतुर्थीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज (८ सप्टेंबर) दीपिकाने मुलीला जन्म दिला आहे. डिलिव्हरीच्या दोन दिवस आधी दीपिका आणि रणवीर हे मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गेले होते. या जोडप्याने कुटुंबासह बाप्पाचे आशीर्वाद घेतले होते. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. यावेळी दीपिका हिरव्या रंगाच्या बनारसी साडीत तर रणवीर सिंग बेज कुर्ता पायजमामध्ये दिसला. गणरायाचा आशीर्वाद घेतल्यानंतर शनिवारी दीपिकाला मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आज रविवारी दीपिकाने चाहत्यांना गोड बातमी दिली आहे.

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांनी त्यांच्या पहिल्या बाळाचं आमगन झालं आहे. मुंबईतील रुग्णालयात दीपिका पादुकोणनं गोंडस मुलीला जन्म दिला आहे. दीपिका आणि रणवीरच्या आयुष्यातील नवीन अध्यायाला सुरुवात झाली आहे. ही गोड बातमी कळताच चाहत्यांकडून ‘दीप-वीर’वर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहेत. चाहते कमेंट करत दीपिका आणि बाळासाठी शुभेच्छा देत आहेत.

फेब्रुवारी महिन्यात दीपिकाने सोशल मीडियावर पोस्ट लिहित गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र त्यानंतर बेबी बंप दिसत नसल्याने नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला होता. इतकंच नव्हे तर जेव्हा दीपिका बेबी बंपसह दिसली, तेव्हासुद्धा ते ‘फेक’ असल्याची टीका काहींनी केली. काही दिवसांपूर्वीच मॅटर्निटी फोटोशूटचे काही खास फोटो पोस्ट करत दीपिकाने त्या सर्व ट्रोलर्सना अखेर सडेतोड उत्तर दिलं होतं.

हे ही वाचा:

Pune Monsoon Updates: दुर्घटना टाळण्यासाठी स्वत:सह कुटुंबाची काळजी घ्या, Ajit Pawar यांचे नागरिकांना आवाहन

पूर परिस्थितीत प्रशासन मदतीसाठी फिल्डवर, बचाव कार्य सुरू CM Shinde यांची माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss