spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

फराह खानवर कोसळला दु:खाचा डोंगर, आईचे झालं निधन, तर दोन आठवड्यांपूर्वीच साजरा केला होता ७६ व वाढदिवस

मनोरंजन क्षेत्रातील सर्वात मोठी आणि महत्वाची अपडेट नुकतीच समोर आली आहे. प्रसिद्ध कोरियोग्राफर आणि दिग्दर्शक फराह खानवर (Famous choreographer and director Farah Khan) दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मनोरंजन क्षेत्रातील सर्वात मोठी आणि महत्वाची अपडेट नुकतीच समोर आली आहे. प्रसिद्ध कोरियोग्राफर आणि दिग्दर्शक फराह खानवर (Famous choreographer and director Farah Khan) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. फराह खानच्या आईचं निधन झालं आहे. फराह खानची आई मेनका इराणी यांचं वयाच्या ७९ व्या वर्षी वृद्धापकाळानं निधन झालं आहे. मेनका इराणी या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू होते. यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आणि त्या घरी आल्या. तसेच काही महिन्यांपूर्वीही त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. पण त्यांची प्रकृती पुन्हा खालावली आणि त्यांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले तिथे आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मेनका इराणी यांनी शुक्रवारी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती आहे. कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक फराह खान आणि दिग्दर्शक साजिद खान (Choreographer and director Farah Khan and director Sajid Khan) यांची आई मेनका इराणी यांचं निधन झालं आहे. मेनका इराणी या दीर्घकाळ आजारी होत्या आणि गेल्या काही महिन्यांत त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांच्या मृत्यूचं खरं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

फराह खान आणि साजिद खानची आई मनेका इराणी यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण बॉलिवूड शोककळा पसरली आहे. फराहने दोन आठवड्यांपूर्वीच तिच्या आईचा ७९ वा वाढदिवस साजरा केला होता. मुंबईच्या नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. उपचार आणि डिस्चार्ज झाल्यानंतर मेनका घरी परतल्यानंतर फराहने आईचा वाढदिवस साजरा केला. १२ जुलै रोजी फराहने आईचा वाढदिवस साजरा केला आणि सोशल मीडियावर दोघांचे फोटो शेअर करून तिला शुभेच्छाही दिल्या होत्या. आईच्या वाढदिवसाच्या दिवशी तिने एक अतिशय भावनिक पोस्टही शेअर केली होती. आईच्या निधनानंतर फराहची ती पोस्ट आता व्हायरल होत आहे. फराहने तिच्या पोस्टमध्ये लिहिले होते, “आम्ही सर्वजण आपल्या आईला हलके घेतो… खासकरून मला! गेल्या महिन्यात हे उघड झाले आहे की मी माझ्या आई मेनकावर किती प्रेम करतो. … ती सर्वात मजबूत आहे. , मी आजवर पाहिलेला सर्वात धाडसी व्यक्ती.. वाढदिवसाच्या शुभेच्छा आई, तू पुन्हा माझ्याशी लढत आहेस.. मी तुझ्यावर प्रेम करते.” काजोल, हुमा कुरेशी , गौहर खान, अभिषेक बच्चन, अनन्या पांडे, भारती सिंग यांनी फराहच्या पोस्टवर कमेंट केली.

मेनका इराणी या प्रसिद्ध बाल कलाकार डेझी इराणी आणि लेखिका हनी इराणी (जावेद अख्तरची माजी पत्नी) यांच्या बहिण होत्या. मनेका इराणी या एक अभिनेत्री होत्या. १९६३ मध्ये रिलीज झालेल्या ‘बचपन’ चित्रपटात मनेका इराणी यांनी काम केलं होतं. हा चित्रपट सलीम खान यांनी लिहिला होता.

हे ही वाचा:

Pune Monsoon Updates: दुर्घटना टाळण्यासाठी स्वत:सह कुटुंबाची काळजी घ्या, Ajit Pawar यांचे नागरिकांना आवाहन

पूर परिस्थितीत प्रशासन मदतीसाठी फिल्डवर, बचाव कार्य सुरू CM Shinde यांची माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss