spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित ‘शिवरायांचा छावा’ हा नवा चित्रपट लवकरच होणार प्रदर्शित

मराठी चित्रपटसृष्टीत छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा सांगणारे अनेक चित्रपट येऊन गेले. तसेच गेल्या काही वर्षात प्रदर्शित झालेल्या ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ या चित्रपटांमध्ये शिवाजी महाराजांची यशोगाथा दाखवण्यात आली आहे. तसेच या चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. स्वराज्यरक्षक संभाजी ही झी मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रसारित होणारी मालिका छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन प्रवासावरची महती सांगणारी मालिका होती. या मालिकेची कथा प्रतापराव गंगावणे यांनी लिहिली होती. या मालिकेला देखील लोकांचा छान प्रतिसाद मिळाला. यातच आता ‘शिवरायांचा छावा’ हा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की, “छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या छत्रपती शंभूराजांच्या चरणी माझी कला सेवा अर्पण करू शकलो यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. छत्रपती शंभूराजांच्या पराक्रमावर आधारित ‘शिवरायांचा छावा’ हा चित्रपट तरुणांना नक्कीच प्रेरणा देईल. जय शिवराय..जय शंभूराजे..

शिवरायांचा छावा’ या चित्रपटाच्या माध्यमातून अलीकडच्या तरुणाईला छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य पराक्रमाची माहिती देण्यात येईल. त्याच बरोबर त्यांना संभाजी महाराजांनी केलेला संघर्ष व त्यांचा इतिहास याबद्दल माहिती मिळेल. हा सिनेमा मल्हार पिक्चरची पहिली मराठी कलाकृती असून याचे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी, तर निर्मिती सनी रजानी यांनी केली आहे. चित्रपटाचे शूटींग पूर्ण झाल्यावर संपूर्ण टीमने एक छोटेसे सेलेब्रेशन केले. या सेलेब्रेशनचा विडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची कथा ही सर्वांच्याच ओळखीची असली ,तरी संभाजी महाराजांचा पराक्रम हा लोकांसाठी तितकासा ओळखीचा नाही. तसेच त्यांच्यावर चित्रपटही जास्त बनवण्यात आले नाहीत. त्यामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळेल हे बघणे मुख्य ठरणार आहे.

हे ही वाचा:

EXCLUSIVE INTERVIEW : महाराष्ट्राच्या राजकारणात चक्रीवादळ आणणारी Sanjay Raut यांची तुफानी मुलाखत!

वाढदिवसानिमित्त मनसे राज ठाकरे यांचे मनसैनिकांना आवाहन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss