spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुलीवर प्रेमाचा वर्षाव करतानाचा अभिनेत्री प्रियांका चोप्राचा फोटो होतोय व्हायरल

'हॅपी बर्थडे जीजू, मिस यू गाईज.' असे कॅप्शन देत पोस्ट शेअर केली आहे.

निक जोनास ३० वर्षांचा झाला आहे. त्याने १६ सप्टेंबर रोजी पत्नी प्रियांका चोप्रा आणि मुलगी मालती मेरीसोबत त्याने वाढदिवस साजरा केला. निकने यापूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये तो एका खाजगी जेटमध्ये आपल्या कुटुंबासह वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी निघत होता. आता प्रियांका आणि निकची चांगली मैत्रीण तमन्ना दत्तने एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये निक जोनास आणि प्रियांका चोप्राची मुलगी मालती देखील दिसत आहे.

तमन्ना आणि प्रियांका चांगल्या मैत्रिणी आहेत. तमन्नाने निकच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या फोटोमध्ये तमन्ना निक आणि प्रियंकासोबत उभी आहे. त्याचवेळी प्रियांकाच्या मांडीवर मालती मेरी आहे, जिच्या चेहऱ्यावर तमन्नाने हार्ट इमोजी लावला आहे. या फोटोवर तमन्ना म्हणाली, ‘हॅपी बर्थडे जीजू, मिस यू गाईज.’ असे कॅप्शन देत पोस्ट शेअर केली आहे. निक आणि प्रियांकाच्या जवळच्या मित्रांचे म्हणणे आहे की त्यांची मुलगी मालती आयुष्यात पासून दोघेही खूप आनंदी आहेत.

निक आणि प्रियांका १५ सप्टेंबरच्या संध्याकाळी मुलगी मालतीसोबत वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी निघाले होते. यावेळी निकने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो एका प्रायव्हेट जेटकडे जात आहे आणि प्रियांका चोप्रा आत फोनवर बोलत आहे. निक-प्रियांका यांनी ते सेलिब्रेशनसाठी कुठे जाणार आहेत हे सांगितले नाही. अशा परिस्थितीत, निक आणि प्रियांकाचे चाहते गेल्या दिवसापासून त्यांच्या ताज्या फोटोंची वाट पाहत आहेत, परंतु दोघांनीही त्यांच्या सोशल अकाउंटवर आतापर्यंत काहीही शेअर केलेले नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nick Jonas (@nickjonas)

 प्रियांका चोप्रा अनेकदा मालती मेरीसोबतचे फोटो शेअर करत असते. ज्यांना पाहून असे वाटते की प्रियांका आजकाल मातृत्वाचा आनंद घेत आहे. या वर्षी जानेवारीमध्ये मालती निक आणि प्रियांकाच्या आयुष्यात आली होती.

हे ही वाचा:

‘राडा’ सिनेमात पाहायला मिळणार ‘या’ दोन खास कलाकारांची जुगलबंदी

‘विक्रम वेधा’ चे BTS व्हिडिओ व्हायरल, आता चित्रपट करणार नवा रेकॉर्ड!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss