spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘बाय बाय यश समीर…’ म्हणत सोशल मीडियावर केला फोटो शेअर

छोट्या पडद्यावरील म्हणजेच झी मराठी वाहिनीवर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना पाहायला मिळत आहे.

छोट्या पडद्यावरील म्हणजेच झी मराठी वाहिनीवर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Mazhi Tuzhi Reshimgaath) ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना पाहायला मिळत आहे. या मालिकेत येणाऱ्या अनेक ट्विस्टमुळे ही मालिका घराघरात लोकप्रिय झाली आहे. या मालिकेच्या कथानकानं आणि मालिकेमधील कलाकारांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. मात्र हि मालिका आता सर्वांचाच लवकरच निरोप घेणार आहे.

 या मालिकेत बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या मालिकेचे मुख्य आकर्षण म्हणजे नेहाची गोड मुलगी अर्थात परी. परीची भूमिका मायरा वायकुळने (Mayra Vaikul) साकारली आहे. या सर्व कलाकारांनी मालिकेतील अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवलं. तसेच अभिनेता संकर्षण कऱ्हाडे, प्रदीप वेलणकर या कलाकारांमुळे मालिकेला चार चांद लागले आहेत. यातील समीर हे पात्र साकारत असलेला अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने नुकताच या मालिकेतला शेवटचा चित्रित केला. त्याने या संदर्भातील भावुक पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे या मालिकेत श्रेयस तळपदे च्या मित्राची भूमिका साकारत होता. श्रेयस आणि संकर्षण हे दोघे लहानपणापासूनचे मित्र दाखवले गेले आहेत. दोघांच्यातील मित्राचे नाते फार सुंदररित्या दाखवले होते. संकर्षणने साकारलेले पात्र हसमुख, विनोदी स्वभावाचे आणि मित्राच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे असे ते पात्र होते. संकर्षणने आपल्या पोस्टमध्ये लिहले आहे ‘बाय-बाय यश समीर काल आम्ही यश आणि समीर म्हणून माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतला शेवटचा सीन शूट केला मला माझ्या मित्राची, यशाची माझ्या पात्राची, समीरची आणि त्यांच्या अफलातून मैत्रीची कायम आठवण येत राहील’.

नुकताच झी मराठीवर एका नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित होत आहे. ‘दार उघड बये’ असे या मालिकेचे नाव आहे. येत्या १९ सप्टेंबरपासून ही मालिका सुरु होणार आहे. दररोज रात्री ८.३० वाजता ही मालिका प्रक्षेपित केली जाणार आहे. त्यामुळेच ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका बंद होणार असल्याचे बोललं जात आहे. यानंतर या मालिकेच्या अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे. अनेकांनी ही मालिका बंद करु नये, अशा अनेक कमेंटही केल्या आहेत.

हे ही वाचा :- 

यश, परी आणि नेहा घेणार का प्रेक्षकांचा निरोप ?

13 सप्टेंबरपासून सुरु होणार आर्थिक दुर्बल घटकांच्या 10 टक्के आरक्षण वैधतेबाबतची सुनावणी

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss