spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Aishwarya Narkar अभिनेत्री ऐश्वर्या नारकर वयाच्या पन्नाशीत इतक्या फिट कशा? ‘या’ व्हिडिओत उघड झालं सीक्रेट

झी मराठी वाहिनी (Zee Marathi channel) वरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ( satvya mulichi satvi mulgi) मालिका सध्या चर्चेत आहे. या मालिकेमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Actress Aishwarya Narkar) नकारात्मक भूमिका साकारत आहेत. रुपाली राजाध्यक्ष हे त्यांचं मालिकेमधील पात्र प्रेक्षकांच्याही पसंतीस पडत आहे. आपल्या कामाच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढत ऐश्वर्या नारकर तितक्याच सोशल मीडियावर सक्रिय असतात. आपल्या सौंदर्याचे प्रदर्शन करत त्या अनेक पोस्ट आपल्या सोशल मीडिया (Social media) हॅण्डलवरून प्रसारित करत असतात. सध्या तिच्या वर्कआऊटचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच पसंत केला जात आहे. कारण वयाची पन्नाशी ओलांडूनही ती ज्या पद्धतीनं कठीण वर्कआऊट करताना त्या व्हिडीओत दिसत आहे ते पाहून भल्या भल्यांना घाम फुटेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

हेही वाचा : 

Har Har Mahadev झी मराठी वाहिनीला स्वराज्य संघटनेचा अखेरचा इशारा, वादग्रस्त चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित करण्यास नकार

गेल्या अनेक वर्षांपासनं इंडस्ट्रीत काम करुन जसा तिचा अभिनय बहरत गेला अगदी तसंच तिचं व्यक्तिमत्त्वही बहरलेलं कायम आपण पाहत आलो आहोत. ऐश्वर्या नारकर मराठीतली एक अशी अभिनेत्री आहे जिनं वयाच्या पन्नाशीतही स्वतःला खूप फिट ठेवलं आहे. अर्थात मराठी मनोरंजन क्षेत्रात अशा फिट अभिनेत्री मोजक्याच आहेत ज्यांनी वाढत्या वयात स्वतःला इतके मेंटेन ठेवले आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रकरणी, दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत गृहमंत्री यांची घेणार भेट

काही दिवसांपूर्वीच अभिनेते अविनाश नारकर (Actor Avinash Narkar) आणि ऐश्वर्या नारकर यांच्या लग्नाला तब्बल २७ वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने देखील अविनाश यांनी एक पोस्ट केली होती. या फोटोमध्ये अविनाश यांनी ऐश्वर्या यांच्या मांडीवर डोकं ठेवलं आहे. त्या दोघांच्याही चेहऱ्यावर स्मितहास्य आहे. अविनाश यांनी ही पोस्ट शेअर करत लिहिलं, ‘ऐश्वर्या तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या प्रेमा तुला जन्मदिनाच्या शुभेच्छा. तुझ्या मनातील सर्व इच्छा, आशा, आकांक्षा, महत्वकांक्षा आणि स्वप्नांची तुझ्या मनाप्रमाणे पूर्तता होवो बब्बू.’ असे म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Avinash Narkar (@avinash.narkar)

Eysing PF40 Electric Bike महिंद्राने बनवली चक्क ‘६०’ किलोची इलेक्ट्रिक बाइक

Latest Posts

Don't Miss