Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे काय करते’ मालिकेत नव्या पात्राची एन्ट्री

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका आहे. 'आई कुठे काय करते'ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरत आहे.

Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे काय करते’ मालिकेत नव्या पात्राची एन्ट्री

‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका आहे. ‘आई कुठे काय करते’ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरत आहे. मालिकेत प्रत्येक व्यक्तिरेखेच्या आयुष्यात काही ना काही प्रसंग घडत आहेतच. मालिका आईची असली, तरी आईभोवतीची पात्रंही तितकीच महत्त्वाची दाखवली जातात. मालिकेत येणाऱ्या नव्या ट्विस्ट आणि वेगळ्या कथानकामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. अनेकदा टीआरपीतदेखील ही मालिका पहिल्या क्रमांकावर असते.

सध्या मालिकेत अरुंधती आणि आशुतोष यांची वाढणारी जवळीक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतेय. मालिकेतील प्रत्येक घडामोड सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल असते. अशातच ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील पुढच्या भागाची अपडेट समोर आली आहे. अरुंधती आणि आशुतोष यांच्याविषयी मोठी घडामोड घडणार आहे. आता या मालिकेत एका नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. नव्या पात्राच्या एन्ट्रीमुळे अरुंधती आणि आशुतोषच्या नात्यात नवं वळण येणार आहे.

अनुष्काच्या येण्याने अरुंधती आणि आशुतोषच्या नात्यात कोणतं वळण येणार हे पहाणं उत्सुकतेचं असणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या मालिकेत खूपच भावनिक गुंतागुंत पाहायला मिळाली. गेल्या आठवड्यात टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका सहाव्या स्थानावर होती. या मालिकेला ५.९ रेटिंग मिळाले होते.

मालिकेविषयी स्वरांगी म्हणाली,”आई कुठे काय करते’ या मालिकेची मी चाहती आहे. खऱ्या आयुष्यात मी दोन मुलांची आई असल्यामुळे आई काय काय करू शकते याचा अनुभव घेतच आहे. अशातच या भूमिकेसाठी विचारणा झाल्यावर क्षणाचाही विलंब न लावता मी होकार दिला. या मालिकेच्या सेटवर सकारात्मक वातावरण आहे. त्यामुळेच काम करताना खूप मजा येते.

हे ही वाचा : 

Supriya Sule: जनरल डायरने जसा अन्याय केला तसा अन्याय हे सरकार करतयं; सुप्रिया सुळेंची जहरी टीका

वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी HIVग्रस्त गर्भवतीवर उपचारास दिरंगाई केल्याने नवजात बालकाचा मृत्यू

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version