spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मराठमोळ्या पद्धतीत होणार आमिर खानच्या लेकीचं लग्न,इरा आणि नुपूर लवकरच बांधणार लग्नगाठ

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानची लेक इरा खान आता लग्नगाठ बांधणार आहे.इराचा साखरपुडा वर्षभरापूर्वीचं तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत पार पडला.

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानची लेक इरा खान आता लग्नगाठ बांधणार आहे.इराचा साखरपुडा वर्षभरापूर्वीचं तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत पार पडला.त्यानंतर दोघांच्या लग्नाची चर्चा सुरू झाली.अखेर आता काही दिवसांतच इरा आणि नुपूर लग्नबंधनात अडकणार आहेत.नुपूर आणि इरा मराठमोळ्या पद्धतीनं लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

खान आणि शिखरे कुटुंबियांसाठी हे नवं वर्ष खुप खास असणार आहे. येत्या नवीन वर्षात ३ जानेवारी रोजी इरा आणि नुपूर यांचा विवाहसोहळा ताज लॅंड्स एंडमध्ये पार पडणार आहे. तर त्यानंतर दोन वेगवेगळे रिसेप्शन आयोजित करण्यात आले आहेत. एक रिसेप्शन हे दिल्लीत असणार आहे तर दुसरं रिसेप्शन हे जयपूरमध्ये असल्याचं म्हटलं जातंय. इरा आणि नुपूर यांचं लग्न मुंबईत असल्यानं अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी या विवाहसोहळ्याला उपस्थित राहतील असं म्हटलं जात असलं तरी सध्या बॉलिवूडचे बरेच सेलिब्रिटी हे नवं वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी परदेशात गेल्याचं दिसून येतंय.

इरा खान ही सोशल मीडियीवर कायम सक्रिय असते,ती तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत सतत अपडेट राहत असते.तर काही दिवसांपर्वी इरानं तिच्या इन्स्टाग्रावर काही फोटो शेअर केले होते. यात लग्नापूर्वीचे जे विधी असतात त्यांना सुरुवात झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यात विशेष म्हणजे सगळ्या विधींमध्ये मराठी संस्कृती आणि पारंपरिकपणा पाहायला मिळतोय.इराने काही दिवसांपूर्वी तिच्या केळवाणाचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले होते.त्यातही पांरपारिकपणा जपण्यात आला होता,ते फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.इराच्या या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात आला होता. दरम्यान, इरा आणि नुपूर २०२० पासून एकमेकांना डेट करत आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये इरा आणि नुपूर यांनी साखरपुडा केला होता. मित्रपरिवार आणि जवळचे नातेवाईक यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला होता.

दरम्यान इरा खान हिला नेहमीच हटके काय तरी करायची आवड आहे. काही दिवसांपूर्वीच इराच्या लग्नाचं आमंत्रण तिच्या मित्र-मैत्रिणींना पोहोचलंय. पण यातही अनेक ट्विस्ट आणि टर्न्स आहेत. वेडिंग कार्ड मिळाल्यानंतर इराच्या मित्र-मैत्रिणींची नेमकी प्रतिक्रिया काय होती, हे तिनं एका व्हिडिओतून शेअर केलं होतं. इरा आणि नुपूर यांच्या लग्नाची पत्रिका ही एक पझल गेम होती.तिच्या लग्न पत्रिकेमध्ये देखील एक वेगळा अंदाज पाहायला मिळतोय,तर आमिरच्या लेकीचा लग्नसोहळा किती ग्रॅन्ड असेल हे पाहणं आता औस्तुकत्तेचं ठरणार आहे.

हे ही वाचा:

शेतकरी आक्रोश मोर्चात सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचे नेतृत्व

MAKEUP BRUSH ची निवड कशी करावी? त्यांची काळजी कशी घ्यावी?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss