spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आमिर खान: ‘कॉफी विथ करण 7’मध्ये करिनाने केली आमिरची खिल्ली, अभिनेता म्हणाला- शोमध्ये अपमान आहे

करीना कपूर आमिर खानची मस्करी करताना दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुरू असणारा करण जोहरचा प्रसिद्ध चॅट शो ‘कॉफी विद करण’ सीजन ७ ला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे. तसेच आतापर्यंत शोमध्ये अक्षय कुमार, समंथा, रणवीर सिंग, आलिया भट, विजय देवरकोंडा अशा विविध प्रसिद्ध कलाकारांनी हजेरी लावली आहे.

तर या सर्व एपिसोड्सप्रमाणे येणारे एपिसोड देखील तितकेच सुपरहिट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण कॉफी विद करणच्या या एपिसोड मध्ये बॉलीवूड अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री करीना कपूर आपली उपस्थिती दर्शवणार आहेत. हल्लीच रिलीज झालेल्या शोच्या प्रोमोमुळे या एपिसोड बद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

या प्रोमो चा व्हिडिओ स्वतः करण जोहरने आपल्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये करीना कपूर आमिर खानची मस्करी करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये करीना आमिर खानला म्हणते की, “अक्षय कुमार आपल्या सिनेमाचे शूटिंग ३० दिवसात पूर्ण करतो तर दुसरीकडे तेच शूट पूर्ण व्हायला आमिर खान यांना शंभर ते दोनशे दिवस लागतात. त्याचप्रमाणे करीना आमिर खानच्या ड्रेसिंगसेन्सबद्दल बोलताना देखील दिसून येत आहे. ज्यावर आमिर खान “या शोमध्ये आल्यावर अपमान हा होतोच” असे हसत म्हणताना दिसून येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

आमिरचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता त्याला करण जोहरच्या इन्स्टाग्रामवरही ट्रोल केले जात आहे. लोक या व्हिडिओवर कमेंट करून चित्रपटावर बहिष्कार घालत असल्याची चर्चा करत आहेत. नुकताच सोशल मीडियावर लाल सिंह चड्ढा बॉयकॉटचा ट्रेंड सुरू झाला होता, त्यानंतर आमिरने या चित्रपटावर बहिष्कार न ठेवण्याचे आवाहन केले होते.

Latest Posts

Don't Miss