आमिर खान बनवणार ‘दंगल 2’? विनेश फोगटशी व्हिडीओ कॉलवर केली चर्चा…

भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा चित्रपट म्हणजे दंगल. हा चित्रपट २०१६ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने लोकांची मने तर जिंकलीच पण बॉक्स ऑफिसवर असे रेकॉर्ड्सही रचले जे मोडणे फार कठीण आहे.

आमिर खान बनवणार ‘दंगल 2’? विनेश फोगटशी व्हिडीओ कॉलवर केली चर्चा…

भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा चित्रपट म्हणजे दंगल. हा चित्रपट २०१६ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने लोकांची मने तर जिंकलीच पण बॉक्स ऑफिसवर असे रेकॉर्ड्सही रचले जे मोडणे फार कठीण आहे. कुस्तीपटू गीता आणि बबिता फोगट यांच्या जीवनावर आमिर खानने दंगल हा चित्रपट बनवला होता. चांगली कथा मिळाली तरच ‘दंगल 2’ येईल असे आमिर खान नेहमी म्हणत होता आणि आता त्याचा शोध संपणार असल्याचे चित्र एकंदरीत दिसत आहे. भारताची चॅम्पियन कुस्तीपटू विनेश फोगटची कहाणी खूप प्रेरणादायी आहे आणि आमिरने विनेशशी फोनवर बोलणेही केले आहे.

सध्या सगळीकडे एक स्क्रीनशॉट तुफान व्हायरल होत आहे ज्यामध्ये आमिर खान विनेश फोगटशी व्हिडिओ कॉलवर बोलत आहे. आता ‘दंगल 2’ येईल आणि तो ‘दंगल’चा रेकॉर्ड मोडेल असा अंदाज युजर्सने मात्र लावायला सुरुवात केली आहे.

विनेश फोगटला घेऊन आमिर खान बनवणार ‘दंगल २’?

बॉलीवूड नाऊच्या म्हणण्यानुसार, जेव्हा भारताची चॅम्पियन कुस्तीपटू विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधून परतली तेव्हा आमिर खानने तिला कॉल केला. असे सांगितले जात आहे की आमिर खानने विनेश फोगटशी खूप वेळ संवाद साधला ज्यामध्ये त्याने तिचे अभिनंदन केले, तिला भविष्यात चांगले खेळण्यासाठी प्रोत्साहित केले आणि तिच्याबद्दल बोलले.

सध्या ही गोष्ट सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे की, आमिर खान जेव्हा विनेशशी बोलला तेव्हा त्याने काहीतरी विचार केला असेल. आमिर खान कदाचित ‘दंगल 2’ बनवण्याचा विचार करत असेल कारण विनेश फोगटची कथा देखील गीता आणि बबिता फोगट यांच्याप्रमाणेच प्रेरणादायी आहे. आमिर खानने यापूर्वीही चांगली कथा मिळाल्यास ‘दंगल 2’ बनवण्याबाबत बोलले होते. आता विनेश फोगट जगभरात प्रसिद्ध आहे आणि लोकांना तिच्याबद्दल जाणून घ्यायचे आहे, तेव्हा कदाचित आमिर ‘दंगल 2’बद्दल विचार करेल. दंगल हा चित्रपट २३ डिसेंबर २०१६ रोजी जगभरात प्रदर्शित झाला. नितीश तिवारी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात आमिर खान, झायरा वसीम, साक्षी तलवार, सान्या मल्होत्रा, सुहानी भटनागर, अपारशक्ती खुराना आणि फातिमा सना शेख यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. Sacnilk च्या मते, दंगल चित्रपटाचे बजेट ७० कोटी रुपये होते तर बॉक्स ऑफिसवर चित्रपटाचे जगभरातील कलेक्शन २०७० कोटी रुपये होते. भारतात या चित्रपटाचे कलेक्शन ५३५ कोटी होते पण चीनमध्ये या चित्रपटाचे सर्वाधिक १३०५ कोटी कलेक्शन होते. या चित्रपटाचा विक्रम आजही कायम आहे, जो सध्या तरी मोडणे कठीण आहे.

हे ही वाचा:

महायुती आणि मविआला टक्कर देण्यासाठी महाराष्ट्रात तिसरी आघाडी स्थापन होणार, बच्चू कडूंनी केला मोठा दावा

मालवण मध्ये जे झाले ते महाराष्ट्राच्या गृहखात्यावर थुंकण्याचा प्रयत्न; Devendra Fadnavis गृहमंत्री म्हणून लाज वाटली पाहिजे: Sanjay Raut

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version