spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘आभाळमाया’ फेम अभिनेते पराग बेडेकर यांच वयाच्या ४७ व्या वर्षी झाल हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक पराग बेडेकर (Parag Bedekar) यांनी वयाच्या ४७ च्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. झी मराठी (zee marathi)) वाहिनीवरील आभाळमाया (Abhalmaya) या मालिकेतून घरोघरी पोहोचलेले अभिनेते पराग बेडेकर यांच हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झालं आहे. त्यामुळे संपूर्ण मराठी सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. पराग यांना झोपेत असताना हृदय विकाराचा झटका आला असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांनी मराठी मालिकांमधून आणि नाटकांमधून त्यांच्या अभिनयाची छाप सोडली होती.

पराग यांना लहान पणापासून अभिनयाची आवड होती. पराग हे कॉलेज मध्ये असतानाच त्यांनी अभिनयाला सुरुवात केली होती. त्यांनी नाट्य स्पर्धा आणि कार्यशाळा यांच्या मध्ये काम केले. या माध्यमातून त्यांचा अनेक युवा रंगकर्मींशी संपर्क झाला त्यानंतर त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवरून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं.त्यांनी ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’,(Me Nathuram Godse Boltoy) ‘लाली लीला’,(Lali-Lila) ‘पोपटपंची’,(Popatpanch) ‘सारे प्रवासी (Sare Pravasi Ghadiche) घडीचे’ या दमदार नाटकांमध्ये अभिनय केला. नाटकांसह त्यांनी ‘आभाळमाया’, ‘कुंकू’, ‘चारचौघी’, ‘एक झुंझ वादळाशी’, ‘ओढ लावावी जिवा’ अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्येही काम केले. अभिनयाबरोबरच त्यांनी दिग्दर्शनही केले होते. त्यामुळे अशा या दुहेरी कला असलेल्या कलाकाराच्या निधनामुले मराठी सिनेसृष्टीत कधीही ना भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

पराग बेडेकर यांच्या निधनानंतर मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध लेखक चंद्रशेखर गोखले (Chandrakant Gokhale) यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी त्यांच्या पोस्ट मध्ये लिहिल आहे की “परागकण गेले? उत्तम अभिनेता होता , अतिशय सहज अभिनय करू शकायचा , बोलत असताना नाक घासण्याची त्याची स्वतःची खास शैली होती मी त्यावरून छेडलं तर छान हसायचा , त्याचं हास्य अप्रतिम होतं , तो कुठे गेल, कुठे गेला, हा शोध आज अचानक थांबला! ” असे लिहीत त्यांनी दुःख व्यक्त केल आहे. त्यांच्या या पोस्ट वर अनेक नेटकऱ्यानी पराग बेडेकर याना श्रद्धांजली वाहिला आहेत.याच बरोबर अभिनेता सागर खेडेकर (Sagar Khedekar) यानीही फेसबुक पोस्ट करत श्रद्धांजली वाहिली आहे.

हे ही वाचा : 

‘रात्रीस खेळ चाले ३’ मालिकेतील शेवंता करणार या दिग्दर्शकाशी लग्न , हळदीचे फोटो झाले व्हायरल

अभिनेता वरुण धवनला कानाशी निगडित ‘व्हेस्टिब्युलर हायपोफंक्शन’ आजाराशी देतोय झुंज, जाणून घ्या या आजाराविषयी माहिती

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss