Tuesday, July 2, 2024

Latest Posts

राम मंदिर उद्घटनाच्या पार्श्वभूमीवर अभिजीत बिचुकले म्हणाले, त्याचं पाप नरेंद्र मोदी यांना लागेल…

देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अश्यातच बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले देखील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची मूर्ती विराजमान झाली असून उद्या दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा हा पार पडणार आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः या सोहळ्यासाठी उपथित राहणार आहेत. मोदींच्या हस्ते त्याची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्यासाठी संपूर्ण देशातून अनेक मोठं मोठे नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत. त्याचसोबत कलाकार मंडळी, खेळाडू देखील मोठ्या संख्येने हजेरी लावणार आहेत. राम मंदिर लोकार्पण सोहळ्याची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर देशभर जल्लोष करण्यात येत आहे. देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अश्यातच बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले देखील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी साताऱ्यातही पोवई नाक्यावर एक भला मोठा बॅनर हा लावला आहे. या बॅनरवर प्रभू रामचंद्रांच्या पायाजवळ हात जोडून बसलेला बिचुकले यांचा फोटो आहे. हा भला मोठा बॅनर सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. यानंतर अभिजीत बिचुकले यांनी माध्यमांशी संवाद हा साधला आहे. यावेळी माध्यमांशी बोलत असताना बिचुकले म्हणाले आहेत की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मी मोठा फॅन आहे. पण मला मोदींची एक गोष्ट खटकली. त्यांचा सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत प्रभू राम हे मोदींचं बोट पकडून जाताना दिसत आहेत. राम हे छोटे दाखवले आहेत. तर मोदी हे मोठे दाखवले आहेत. त्यातून मोदींना काय सूचवायचं आहे? असा सवाल बिचुकले यांनी केला. श्रीराम हे कुठल्या एका जातीचे नाहीत. कुठल्या धर्म, पंथाचे नाहीत तर प्रभू रामचंद्र हा एक विचार आहे. मी त्यांचा भक्त आहे. हेच मला यातून दाखवून द्यायचं आहे. म्हणूनच मी पोवई नाक्यावर हा बॅनर लावला आहे, असं अभिजीत बिचुकले म्हणाले.

मी राम भक्त आहे देशाला मानतो. याचं पुण्य मला नक्की मिळेल. हिंदू हा धर्म नसून स्टाईल ऑफ लिविंग लाइफ आहे. सर्व राजकीय नेत्यांना माझा प्रश्न आहे. कुणी डोक्याला टिळक लावून फिरता का? मी १९९१ सालापासून डोक्याला टिळक लावून फिरतो. मी हिंदू पद्धतीने जगतो. ती जीवनाची पद्धत आहे, धर्म नाही. भगव्याचा अर्थ दुसऱ्यांना शिव्या घालणे नाही. भगव्याचा खरा अर्थ आहे गौतम बुद्धांनी सांगितला. भगवा घाला, त्याग करा आणि दुनियेला चांगल्या मार्गावर आणा, असा भगव्याचा अर्थ आहे, असंही ते म्हणाले. प्रभू रामचंद्राचं मंदिर होतंय ही आनंदाची गोष्ट आहे. मात्र हा उत्सव रामनवमीच्या दिवशी का घेतला नाही? असा माझा प्रश्न आहे. मी प्रसारमाध्यमातून ऐकतोय की अजूनही या मंदिराचं काम सुरू आहे. अर्धवट मंदिराचा लोकार्पण सोहळा होत असेल तर याचं पाप नरेंद्र मोदी यांना लागेल, असंही ते म्हणाले.

 

Latest Posts

Don't Miss