Abhishek Bachchan ने पत्नी Aishwarya Rai सोबत घटस्फोटाच्या अफवांना पुन्हा घातले खतपाणी ! अभिनेत्याची ‘ती’ कृती ठरतेय चर्चेचा विषय

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन (Abhishek Bachchan and Aishwarya Rai Bachchan) यांच्यातील मतभेदाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. या जोडप्याचा घटस्फोट होत असल्याची अफवा सध्या पसरवली जात आहे. मात्र, दोघांनीही या बातम्यांवर अद्याप एकही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Abhishek Bachchan ने पत्नी Aishwarya Rai सोबत घटस्फोटाच्या अफवांना पुन्हा घातले खतपाणी ! अभिनेत्याची ‘ती’ कृती ठरतेय चर्चेचा विषय

Abhishek Bachchan On Divorce Post : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन (Abhishek Bachchan and Aishwarya Rai Bachchan) यांच्यातील मतभेदाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. या जोडप्याचा घटस्फोट होत असल्याची अफवा सध्या पसरवली जात आहे. मात्र, दोघांनीही या बातम्यांवर अद्याप एकही प्रतिक्रिया दिलेली नाही. नुकत्याच पार पडलेल्या अनंत अंबानीच्या लग्नसोहळ्याला ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबीयांच्या वेगवेगळ्या एण्ट्रीनेही नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. अशातच अभिषेकने इन्स्टाग्रामवरील एक पोस्ट लाईक केली आहे. ही पोस्ट घटस्फोटाशी संबंधित आहे. एका पत्रकाराने सोशल मीडियावर घटस्फोटासंबंधिची पोस्ट शेअर केली होती.

ऐश्वर्यासोबत घटस्फोटाच्या अफवांदरम्यान अभिषेक बच्चनने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट लाइक केली होती. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. अभिषेकने लाईक केलेल्या पोस्टमध्ये घटस्फोटाच्या अडचणी आणि ‘ग्रे घटस्फोट’च्या वाढत्या ट्रेंडवर चर्चा करण्यात आली होती. लेखिका हीना खंडेलवाल यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये लिहिले आहे, “जेव्हा प्रेम सोपे होणे थांबते. लग्न झालेले जोडपे आता वेगळे होत आहेत. त्यांना हा निर्णय घेण्यास कशामुळे भाग पाडले आणि ग्रे घटस्फोट का वाढत आहेत?” पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, “घटस्फोट घेणे कोणासाठीही सोपे नाही. आनंदाने जगण्याचे स्वप्न कोण पाहत नाही किंवा रस्ता ओलांडताना वृद्ध जोडप्यांचे हात धरून ते हृदयस्पर्शी व्हिडिओ पुन्हा बनवण्याची कल्पना कोण करत नाही? तरीही, कधी कधी जीवन आपण विचार करतो तसे नसते. पण जेव्हा लोक त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग छोट्या-मोठ्या दोन्ही गोष्टींसाठी एकमेकांवर अवलंबून राहून घालवतात, नंतर अनेक दशके एकत्र राहिल्यानंतर वेगळे होतात, ते कसे हाताळतात? त्यांना नाते तोडण्यास कशामुळे प्रवृत्त होते आणि त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो? या प्रश्नांवर ही कथा प्रकाश टाकते. योगायोगाने, जागतिक स्तरावर ‘ग्रे घटस्फोट’ किंवा ‘सिल्व्हर स्प्लिटर’ वाढत आहेत. ग्रे घटस्फोट म्हणजे जेव्हा विवाहित जोडपे वेगळे होण्याचा निर्णय घेतात, साधारणपणे ५० वर्षांच्या नंतर. कारणे वेगळी असली तरी आश्चर्यकारक नाही.

ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चा असतानाच अंबानींच्या कार्यक्रमात ऐश्वर्या आणि अभिषेकने वेगवेगळी एण्ट्री केली होती. एकीकडे अमिताभ बच्चन, जया बच्चन, श्वेता नंदा, नव्या नंदा, अभिषेक बच्चन, अगस्त्य नंदा हे सर्वजण एकत्र आले होते. तर फक्त ऐश्वर्या आणि आराध्या हे नंतर आले. २००७ मध्ये ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केलं. ‘गुरू’ या चित्रपटाच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. या दोघांच्या लग्नाला आता जवळपास १६ वर्षे झाली आहेत. या दोघांना आराध्या ही मुलगी आहे. ऐश्वर्या आणि अभिषेकची पहिली भेट २००० मध्ये ‘ढाई अक्षर प्रेम के’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती.

हे ही वाचा:

ASHADHI EKADASHI 2024 : CM EKNATH SHINDE यांनी आषाढी एकादशी निमित्त मागितले विठुरायाकडे साकडे

CM EKNATH SINDE यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा संपन्न; १०३ कोटी रुपये निधीची केली घोषणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version