हृतिक रोशन आणि सैफ अली खानची जोडी घेऊन येणार थ्रिलर सोबत ॲक्शनचा धमाका

हृतिक रोशन आणि सैफ अली खानची जोडी घेऊन येणार थ्रिलर सोबत ॲक्शनचा धमाका

अभिनेता हृतिक रोशन अनेक वर्षाच्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर ॲक्शन मोड मध्ये दिसणार आहे. त्याच्या जोडीला हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध हिरो सैफ अली खान पण असणार आहे. नुकताच ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यता आला आहे. अ‍ॅक्शन पॅक्ड व्हिज्युअल्स आणि आशयघन कथानक असलेला ‘विक्रम वेधा’ या हिंदी चित्रपटाचा टीझर म्हणजे प्रेक्षकांसाठी एक आश्चर्याचा सुखद धक्काच आहे. या चित्रपटात ‘वेधा’च्या भूमिकेत अभिनेता हृतिक रोशन झळकणार आहे, तर सैफ अली खान ‘विक्रम’ साकारत आहे.

टी सिरिजच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर हा टीझर प्रदर्शित झाला आहे, हृतिक आणि सैफ या दोघांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर शेअर करत चाहत्यांना खुशखबर दिली आहे. १ मिनिटं ५५ सेकंदांच्या या टीझरमध्ये हृतिक आणि सैफ यांच्यातली जुगलबंदी पाहायला मिळत आहे. या दोघांबरोबर अभिनेत्री राधिका आपटेची झलकसुद्धा यात आपल्याला बघायला मिळेल.

सोनाली कुलकर्णी साकारणार ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’

‘विक्रम वेधा’ या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये वेदाची भूमिका सर्वप्रथम शाहरुख खानला ऑफर करण्यात आली होती, त्यानंतर हे पात्र आमिर खानकडे गेले. दोघांनीही नकार दिल्यानंतर हा चित्रपट हृतिक रोशनपर्यंत पोहोचला. तथापि, टीझर रिलीज दरम्यान, जेव्हा चित्रपटाचे दिग्दर्शक पुष्कर आणि गायत्री यांना याबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितले की, सुरुवातीपासूनच सैफ अली खानला विक्रम आणि ऋतिक रोशनच्या भूमिकेसाठी वेधाच्या भूमिकेसाठी फायनल करण्यात आले होते. दोघांनाही त्यांच्या भूमिका निवडण्याचा पर्याय देण्यात आलेला नाही.

ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान ‘विक्रम वेधा’चा ट्रेलरही बघायल मिळू शकतो अशी चर्चा रंगत आहे. हृतिक रोशनने आमिरच्या चित्रपटाचं कौतुक केलं त्यामुळे हा चित्रपटही बॉयकॉट करा हा ट्रेंड चांगलाच व्हायरल झाला होता. पण हा टीझर पाहून सोशल मीडियावर प्रेक्षक यांची प्रशंसा करताना दिसत आहेत. येणाऱ्या वर्षात हृतिक वॉर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागातही दिसू शकतो अशी शक्यता आहे.

आशिया चषक २०२२ मध्ये भारताचे किती सामने असतील?, पाकिस्तानविरुद्ध किती सामने रंगतील ? जाणून माहिती

Exit mobile version