spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अभिनेता क्षितिश दाते नेटकऱ्यांवर भडकला

‘धर्मवीर’ चित्रपटात एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत दिसला होता.

सध्या राज्यात राजकीय भूकंप चालू आहे. या प्रकारणावरून अनेक नेटकऱ्यांनी मिम्स तसंच व्हिडीओ बनवायला सुरुवात केली आहे. नुकत्याच आलेल्या ‘धर्मवीर’ चित्रपटात एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत दिसला होता. त्यांच्यासारखं हुबेहूब रूप, त्यांची देहबोली सगळीच क्षितीशने आत्मसात केली होती. त्याच्या या भूमिकेसाठी त्याला प्रचंड प्रमाणात सुद्धा आलं होतं. गेल्या काही दिवसात राज्यात ती राजकीय भूकंपाची परिस्थिती आहे त्यात शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांचं नाव वारंवार येताना दिसत आहे.

राज्यातील चालू परिस्तिथीत त्यावर वेगवेगळी मतं आणि अभ्यास मांडला जात आहे. असतंच काही नेटकऱ्यांनी चालू परिस्थितीत सुद्धा मिम्स बनवायला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर राजकीय परिस्थितीवर मिम्सच्या माध्यमातून चेष्टा होताना दिसत आहे. शिवसेनेतील अनेक नेत्यांवर, स्वतः एकनाथ शिंदे यांच्यावर  सुद्धा अनेक गमतीशीर मिम्स सध्या फिरताना दिसत आहेत. अशातच एका वृत्तपत्राने सुद्धा या मिम्सला आपल्या बातमीत अंतर्भूत केल्याने क्षितीश चांगलाच भडकलेला दिसतो आहे.
क्षितीशचा एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेतला फोटो असलेलं हे मीम असून यात “थोडे दिवस मलाच एकनाथ समजून बैठकीत घ्या’ असं लिहिलेलं आहे. यावर क्षितीशन सोशल मीडियावर स्टोरी टाकत असं लिहिलं आहे, “हे असं छापणं चूक आहे. राज्यात मोठी उलाढाल चालू असताना चेष्टेने मिम्स येणं वेगळं आणि ते वर्तमानपत्रात छापून येणं वेगळं” असं म्हणत क्षितीशने आपलं मत व्यक्त केलं आहे.

Latest Posts

Don't Miss