spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अभिनेता मंगेश देसाईच्या गाडीला भीषण अपघात, सुदैवानं कोणतीही जीविहानी नाही

मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेता व निर्माता मंगेश देसाई यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे.

मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेता व निर्माता मंगेश देसाई यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. मंगेश देसाई आपल्या संपूर्ण कुटुंबासह कर्जतला जात असताना हा अपघात झाला. मंगेश देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

मंगेश देसाई आपल्या कुटुंबासह कर्जतला जात असताना वाशी येथील कोकण भवन या परिसरात हा अपघात झाला. या मार्गावर वाहनांची रहदारी होती. मागून येणाऱ्या गाडीच्या चालकाने अचानक ब्रेक लावल्यामुळे मंगेश यांच्या गाडीला धडक बसली त्यामुळे हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात त्यांच्यासह घरातील कोणत्याही व्यक्तीला दुखापत झालेली नाही. परंतु मंगेश देसाई यांच्या गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.


धडक दिलेल्या गाडी चालकाच्या बाजूला बसलेल्या त्याच्या मित्राला किंचितशी दुखापत झाली असल्यामुळे त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. या संदर्भातली माहिती खुद्द मंगेश देसाई यांनी त्यांच्या फेसबुक हँडल वरून एक व्हिडिओ करत दिली. त्यात ते म्हणाले “तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा माझ्या पाठीशी आहेत त्यामुळे मी अजिबात घाबरणार नाही धन्यवाद मी माझ्या कुटुंबीय आणि मित्रमंडळी सगळे व्यवस्थित आहेत मला भरपूर फोन आले त्यामुळे मी हा व्हिडिओ काढत आहे मी सुखरूप आहे”. असल्याचा मेसेज मंगेश देसाई ने दिला.

हेही वाचा : 

Sharad Pawar Live | खरी शिवसेना कोणाची हे कोर्टात कळेल, शरद पवारांचे व्यक्तव्य

Latest Posts

Don't Miss