spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बाबू कालिया फेम ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे हृद्यविकाराच्या झटक्याने निधन

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे दुखद निधन झाले आहे. प्रदीप पटवर्धन यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मराठी चित्रपटा सोबत त्यांनी मराठी नाटक, मालिका, हिंदी चित्रपटामध्ये काम केले आहे. पटवर्धन यांचे ‘मोरुची मावशी’ हे त्यांचे रंगभूमीवरील नाटक प्रचंड गाजले. या नाटकामुळे त्यांना मनोरंजन सृष्टीमध्ये एक वेगळीच ओळख त्यांनी निर्माण केली होती.

गिरगावमधील झाबावाडी येथे राहणाऱ्या प्रदीप पटवर्धनांनी महाविद्यालयात असताना एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे. मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी केलेल्या अनेक भूमिका गाजलेल्या आहेत. अनेक चित्रपट आणि मालिका आजही तितक्याच लोकप्रिय आहेत. सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या प्रदीप पटवर्धन यांनी वयाच्या ६५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

दिग्गज कलाकार भरत जाधव, विजय चव्हाण, विजय पाटकर, लक्ष्मीकांत बेर्डे यांसारख्या कलाकारांसह त्यांनी रंगभूमी गाजवली आहे. ‘नवरा माझा नवसाचा’, ‘लावू का लाथ’ या सिनेमातील त्यांच्या रंजक भूमिकांनी प्रेक्षकांना नेहमीच हसवले आहे.

हेही वाचा : 

आरे वसाहतीत आदिवासी दिनानिमित्त मिरवणूक…

Latest Posts

Don't Miss