मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते रविंद्र महाजनी काळाच्या पडद्याआड

सध्या ते पुण्यातील तळेगाव-दाभाडे परिसरात भाड्याने राहत होते.

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते रविंद्र महाजनी काळाच्या पडद्याआड

अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmir Mahajani) हा मराठी तसेच हिंदी मनोरंजन सृष्टितील मोठा कलाकार आहे. गश्मीरचे वडील म्हणजेच रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) हे देखील मनोरंजन विश्वातील मोठे कलाकार होते. आपल्या देखण्या आणि रुबाबदार रुपाने मराठी मनोरंजन सृष्टीवर अधिराज्य गाजवणारे अभिनेते रविंद्र महाजनी यांचे आज निधन झाले आहे. ७७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.यामुळे संपूर्ण मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.

काही दिवसांपासून रविंद्र महाजनी हे मनोरंजनसृष्टीपासून दूर होते. सध्या ते पुण्यातील तळेगाव-दाभाडे परिसरात भाड्याने राहत होते. त्यांच्या घरातून दुर्गंधीचा वास येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घराचे दार तोडून प्रवेश केला तेव्हा ते मृतावस्थेत आढळले. दोन-तीन दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. रवींद्र महाजनी यांनी त्यांच्या कारकिर्दीत असलेला काळ खूप गाजवला. त्यांनी त्यांच्या कौशल्याने त्यांचा लकबीने त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीव वेगळाच ठसा उमटवला. त्यांचा जन्म जरी बेळगावात झाला असला तरी ते मुंबई मधेय येऊन त्यांनी त्यानाच नाव पुढे नेलं. अपार मेहनत आणि त्यांच्या इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी त्यांचे नाव पुढे आणले.

मराठी मनोरंजनसृष्टीतील विनोद खन्ना अशी रविंद्र महाजनी यांची ओळख आहे. तसेच ते मराठी मनोरंजनविश्वात हँडसम फौजदार अभिनेता म्हणून ओळखले जात. बेळगावात (Belgaon) जन्मलेल्या रविंद्र महाजनी यांनी नोकरी करण्यासाठी मुंबई गाठली. शिक्षणादरम्यान रविंद्र महाजनी यांना अभिनयाची गोडी लागली होती. म्हणूनच पुढे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रविंद्र महाजनी यांनी सिनेसृष्टीत नशीब आजमावायला सुरुवात केली. रविंद्र महाजनी यांनी ‘जाणता अ जाणता’ या मराठी नाटकाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं. मिळालेल्या पहिल्या संधीचं रविंद्र महाजनी यांनी सोनं केलं. त्यांची पहिलीच भूमिका खूप गाजली. पुढे ‘तो राजहंस एक’ हे त्यांची प्रमुख भूमिका असलेलं नाटक रंगभूमीवर आलं. याच नाटकामुळे रवींद्र महाजनी यांना ‘झुंड’ नावाच्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली. हा त्यांचा पहिला चित्रपट होता.

हे ही वाचा:

भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू तुम्हाला माहित आहे का? तेंडुलकर, कोहली आणि विराटला सुद्धा टाकले मागे

पंतप्रधान मोदी दोन दिवसीय फ्रान्स दौऱ्यावर

अशोक मामांबद्दल खुद्द निवेदिता सराफ यांनी केला खुलासा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version