अभिनेता सलमान खान सह अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांच्या सुरक्षेत वाढ .

अभिनेता सलमान खान सह अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांच्या सुरक्षेत वाढ .

पंजाबचा गायक सिद्धू मुसेवालाची हत्या झाल्या पासून सिनेसृष्टीमध्ये दहशदीचे वातावरण निर्माण झाले होते . नंतर सिद्धू मुसेवालाच्या हत्येमागे बिश्नोई टोळीचा हात असल्याचे पोलिसांनी उघड केले . याच बिश्नोई टोळीकडून बॉलीवूडचे दबंग अभिनेता सलमान खान यांना जीवे मारण्याच्या धमक्या पत्राद्वारे येत होत्या. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने सलमान खान याना Y+ दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे त्याच बरोबर अभिनेता अक्षय कुमार आणि अनुपम खेर याना एक्स क्लास दर्जाची सुरक्षा देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे .

१३ एप्रिल ला गायक सिद्धू मुसेवाला याचा पंजाबमध्ये खून करण्यात आला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीतील अनेक गुंडांना अटक केली, त्यापैकी अनेकांनी सलमानला लक्ष्य केल्याची कबुली दिली. तर जूनमध्ये सलमान खान आणि त्याचे वडील लेखक सलीम खान यांना धमकीचे पत्र पाठवण्यात आले होते, ज्याची दखल ज्येष्ठ लेखकाच्या रक्षकाने घेतली होती. या पत्रात सलमान आणि सलीम यांना ‘मूसवाला’ प्रमाणेच त्यांचा खून करण्याची धमकी देण्यात आली होती.याच बरोबर पोलिसांनी एक अहवाल सादर केला आहे त्यानुसार , अनुपम खेर यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट रिलीज झाल्यानंतर धमक्या मिळाल्या त्यानंतर नंतर त्यांना सुरक्षा कवच वाढवण्यात आले होते. त्याचप्रमाणे अक्षयला त्याच्या राष्ट्रीयत्वाबद्दल सोशल मीडियाच्या धमक्यांच्या आधारावर सुरक्षा प्रदान करण्यात आली असल्याचे अहवालात सांगण्यात आले होते .

आतापर्यंत अभनेता सलमानला मुंबई पोलिसांकडून नियमित पोलिस संरक्षण दिले जात होते.आत मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्याला Y+ सुरक्षा कवच दिले जाईल. तर अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांना आता एक्स-क्लास सुरक्षा दिली जाईल सुरक्षा देण्यात आली आहे. सुरक्षेचा खर्च सेलेब्स उचलणार असल्याची माहिती समोर अली आहे .

गेल्या काही महिन्यांतील पोलिसांच्या तपासात असे समोर आले आहे की, लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार या गुंडांनी सलमान खानला मारण्याची योजना आखली होती. पोलिसांकडून असे सुचवण्यात आले आहे की गुंडांनी दोनदा प्रयत्न केले, एकदा सलमान खानच्या वाढदिवसाच्या दिवशी उत्सवादरम्यान त्याच्या घराबाहेर, तर एकदा त्याच्या पनवेल फार्महाऊसवर.

हे ही वाचा :

कृषिमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती; ‘शेतकऱ्यांना फक्त एक रुपयात…’

२६ नोव्हेंबरला उद्धव ठाकरे घेणार बुलढाण्यात शेतकरी मेळावा

Belgaum : आज बेळगावमध्ये काळा दिन साजरा होत असताना, सीमा भागातील मराठी बांधवांसाठी महाराष्ट्रातील एकही नेता फिरकला नाही!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version