spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अभिनेता शशांक केतकर असणार एका मोठ्या घोटाळ्याचा भाग, ‘त्या’ पोस्टमुळे आले चर्चांना उधाण

शशांकने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेल्या त्या पोस्टमुळे सोशल मीडियावर तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

होणार सून मी या घरची या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता शशांक केतकर लवकरच एका मोठ्या घोटाळ्याचा भाग असणार आहे, अशा चर्चांना सोशल मीडियावर सध्या उधाण आलं आहे. शशांकने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेल्या त्या पोस्टमुळे सोशल मीडियावर तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मराठी अभिनेता शशांक केतकर लवकरच एका हिंदी वेबसिरीजमध्ये झळकणार असल्याची माहिती त्याने त्याच्या या पोस्टद्वारे दिली आहे.

‘स्कॅम १९९२: द हर्षद मेहता स्टोरी’च्या यशानंतर आता आणखी एका घोटाळ्याची संपूर्ण कहाणी पडद्यावर येत आहे. काही महिन्यांपूर्वी ॲपलॉज एंटरटेनमेंटने ‘स्कॅम २००३: द तेलगी स्टोरी’ची घोषणा केली होती. स्कॅम १९९२ ला प्रचंड यश मिळाले. त्यामुळे आता हर्षद मेहता स्कॅमनंतर भारताला हादरवणाऱ्या तेलगी घोटाळ्यावर एक नवीन वेबसिरीज येणार आहे. फळ विक्रेत्या तेलगीच्या भूमिकेसाठी एका अभिनेत्यालाही सामील करण्यात आले आहे. नाट्य कलाकार गगन देव रियार फळ विक्रेत्या तेलगी भूमिका साकारणार आहेत. तर मराठीतील लोकप्रिय अभिनेता शशांक केतकरसुद्धा या वेबसिरीजचा एक महत्त्वाचा भाग असणार आहे.

या वेबसिरीजचा एक भाग असल्यामुळे अभिनेता शशांक केतकर खूप खुश आहे आणि त्याने त्याचा हा आनंद एक पोस्ट करत त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी त्याने चाहत्यांबरोबर हि आनंदाची शेअर केली आहे. त्याने एक खास पोस्ट शेअर करून त्याच्या चाहत्यांना ही माहिती दिली. ह्या पोस्टला त्याने “२०२२ हे वर्ष किती छान होते आणि २०२३ हे किती छान वर्ष असेल” असे कॅप्शन दिले आहे. त्याच्या पोस्टला सध्या भरपूर लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. त्याचबरोबर त्याच्या चाहत्यांनी तसेच इतर सेलिब्रिटींनी शशांकचे अभिनंदन देखील केले आहे.

हे ही वाचा:

Shark Tank Season 2 लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला , अश्नीर ग्रोव्हर आणि गझल अलघच्याजागी दिसणार हे परीक्षक

श्रीदेवीची ऑनस्क्रीन मुलगी आणि पाकिस्तानी लष्कराने हनी ट्रॅपसाठी वापरलेली ही बॉलिवूड अभिनेत्री आहे तरी कोण?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss