Sunil Shende : ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचं निधन; सिनेसृष्टीवर शोककळा

Sunil Shende : ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचं निधन; सिनेसृष्टीवर शोककळा

सिनेसृष्टीतून दररोज वाईट बातम्या समोर येत आहेत. कालच मराठी मनोरंजन सृष्टीतून एक वाईट बातमी समोर आली. लोकप्रिय मराठी मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्री कल्याणी कुरुळे-जाधव हिचा अपघाची मृत्यू झाला. तिच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात असताना आज अजून एक वाईट बातमी समोर आली आहे. मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे निधन झाले आहे. ते ७५ वर्षांचे होते. रात्री १ वाजता मुंबईतील विले पार्ले याठिकाणी असणाऱ्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुनील शेंडे यांच्या अंत्ययात्रेला दुपारी १ वाजता सुरुवात होणार आहे. आज त्यांच्या पार्थिवावर पारशीवाडा याठिकाणी असणाऱ्या स्मशानभूमित अंत्यसंस्कार केले जातील.

हेही वाचा : 

‘महाराष्ट्रात अतिशय गलिच्छ प्रकार सुरू, आव्हाड प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी’ ; अजित पवार

आज दुपारी त्यांचे अंत्यविधी होणार आहेत. मुंबईतल्या पारशीवाडा इथल्या हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी ज्योती, दोन मुलं ऋषिकेश आणि ओमकार, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

Children Day 2022 : बालदिनानिमित्त चाचा नेहरू आणि बालकांच्या काही खास आठवणी

सुनील शेंडे यांनी अनेक हिंदी-मराठी सिनेमांत वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळेच त्यांना हरहुन्नरी अभिनेता म्हटले जाते. रुबाबदार व्यक्तिमत्त्व आणि भारदस्त आवाजामुळे त्यांना पोलीस, राजकारणी अशा भूमिका जास्त मिळाल्या आहेत. नव्वदच्या दशकात सुनील शेंडे खूप लोकप्रिय होते. ‘निवडुंग’, ‘मधुचंद्राची रात्र’, ‘जसा बाप तशी पोर’, ‘ईश्वर’, ‘नरसिम्हा’ अशा अनेक गाजलेल्या सिनेमांत सुनील शेंडे यांनी काम केलं आहे. त्यांनी आपल्या अभिनयाने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही वेगळी छाप सोडली होती. पण गेल्या काही दिवसांपासून ते मनोरंजनसृष्टीपासून दूर होते. आपल्या बहरदार अभिनयाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे सुनील शेंडे यांच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते शोक व्यक्त करत आहेत.

Weather Update Today : तमिळनाडूत आज पावसाचा रेड अलर्ट, तर बर्फवृष्टीमुळे ‘या’ राज्यात शाळा बंद

Exit mobile version