Ved Movie Trailer Out बहुप्रतीक्षित ‘वेड’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, चाहत्यांची सिमेना पाहण्याची उत्सुकता शिगेला

Ved Movie Trailer Out बहुप्रतीक्षित ‘वेड’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, चाहत्यांची सिमेना पाहण्याची उत्सुकता शिगेला

प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांचं ‘वेड’ आता प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून ज्या चित्रपटाची चर्चा सुरू होती. ‘वेड’ या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाल्यानंतर चाहते आता ट्रेलर वाट पाहत आहे, मात्र आता त्याची प्रतीक्षा संपणार आहे. ३० डिसेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘वेड’ चित्रपटाचा ट्रेलर आज १३ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. प्रेम आणि वेड या दोन शब्दांभोवती या चित्रपटाची कथा फिरते, हे या ट्रेलरवरून लक्षात येतं.

Samruddhi Mahamarg औरंगाबादहून नागपूरला जाणारी लाल परी ‘या’ तारखेपासून धावणार समृद्धी महामार्गावर

अभिनेत्री जिनिलिया या चित्रपटाद्वारे तिच्या मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. तर ‘वेड’मधून रितेश देशमुख दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. त्यामुळं या दोघांसाठी हा चित्रपट नक्कीच खास आहे. या दोघांना पुन्हा मोठ्या पडद्यावर एकत्र पाहता येणार असल्यानं दोघांच्या चाहत्यांमध्येही प्रचंड उत्सुकता आहे. ‘वेड’ या चित्रपटाच्या टीझरमध्ये रितेशचा गंभीर लुक, बीचवरचे शूट आणि डायलॉगने प्रेक्षकांना खरोखरच वेड लावले होते. त्यानंतर सिनेमामधील संवाद, गाणी समोर आली. रितेश आणि अभिनेत्री जिया शंकर यांच्यावर हे रोमान्टिक गाणे प्रसारित झाल्यानंतर प्रेक्षकांनी कमी कालावधीत त्याला अधिक पसंती दिली. वेड गाण्याचे म्युझिक, शूट लोकेशन आणि रितेश जियाची केमिस्ट्री बघून चाहत्यांची उत्सुकता आणखी ताणली होती. नंतर आलेले बेसुरी हे गाणेही प्रेक्षकांना प्रचंड आवडले आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढली आहे.

Exit mobile version