Jacqueline Fernandez : अभिनेत्री जॅकलिनच्या जामीन अर्जावर आज होणार सुनावणी

Jacqueline Fernandez : अभिनेत्री जॅकलिनच्या जामीन अर्जावर आज होणार सुनावणी

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या जामीन प्रकरणी दिल्ली न्यायालय आज निर्णय देणार आहे. तत्पूर्वी, गुरुवारी त्यांच्या जामिनावर निकाल येणार होता. मात्र न्यायालयाने निर्णय राखून ठेवत निर्णयासाठी ११ तारीख निश्चित केली होती. पण ११ नोव्हेंबरला दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने अभिनेत्रीच्या अंतरिम जामिनाची मुदत १५ नोव्हेंबरपर्यंत वाढवली. त्यांचा अंतरिम जामीन १० नोव्हेंबर रोजी संपला होता. दुसरीकडे, मंगळवारी म्हणजेच आज, न्यायालय अभिनेत्री जॅकलिनच्या नियमित जामिनावर निर्णय देणार आहे.

१० नोव्हेंबरला झालेल्या सुनावणीदरम्यान जॅकलिन म्हणाली,”तपास यंत्रणेला मी सहकार्य करत आहे. पण तरीही ईडी मला त्रास देत आहे. मी माझ्या कामानिमित्त परदेशात जाते. पण मला परदेशात जाण्यासाठी आडवण्यात आलं. मला माझ्या कुटुंबियांना भेटू दिले जात नाही. याप्रकरणी तपास यंत्रणेला मेल केला असता त्यांच्याकडून यासंदर्भात उत्तर मिळालेले नाही. ईडीचे सर्व आरोप निराधार आहेत”.

हेही वाचा : 

मुंडे बहिण भावात रंगली जुगलबंदी, मिश्किल शैलीत दोघांचा संवाद

ईडीच्या वतीने एक वकिल म्हणाले,”जॅकलिन ही परदेशी नागरिक आहे. तिचे कुटुंब श्रीलंकेत राहते. जॅकलिनने डिसेंबर २०२१ मध्येही पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. २२ ऑक्टोबर रोजी पटियाला हाऊस कोर्टाने जामीन याचिकेवर सुनावणी करताना जॅकलिनला अंतरिम जामीन मंजूर केला होता”.

जॅकलीनवर आरोप आहे की २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सुरेशला भेटल्यानंतर १० दिवसांच्या आत जॅकलीनला त्याचा गुन्हेगारी इतिहास सांगितला गेला. असे असूनही, अभिनेत्री त्याच्या संपर्कात राहिली आणि महागड्या भेटवस्तू घेत राहिली. सध्या आरोपी सुकेश चंद्रशेखर हा तुरुंगात आहे. सुकेशवर प्रभावशाली लोकांसह अनेकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. १७ ऑगस्ट रोजी ईडीने आरोपपत्र दाखल केले होते, ज्यामध्ये जॅकलीनला २०० कोटींच्या खंडणी प्रकरणातही आरोपी आढळले होते. यामध्ये अनेक साक्षीदार आणि पुरावे आधार बनवण्यात आले. यानंतर न्यायालयाने त्यांना समन्स पाठवले होते. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोपी झाल्यानंतर जॅकलिनच्या वकिलाने तिच्या जामिनासाठी याचिका दाखल केली होती.

Shiv Sena Symbol : धनुष्यबाण चिन्ह शिवसेनेला पुन्हा मिळणार?, सुनावणीकडे महाराष्ट्राचं लक्ष

Exit mobile version