अभिनेत्री जॅकलिनला दिल्ली कोर्टाकडून दिलासा, सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलिनचे काय संबंध होते?

अभिनेत्री जॅकलिनला दिल्ली कोर्टाकडून दिलासा, सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलिनचे काय संबंध होते?

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला काल दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला आहे. कथित आरोपी सुकेश चंद्रशेखरशी संबंधित २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात जॅकलिनला आरोपी म्हणून न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. सक्तवसुली संचालनालयाने ‘प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट’ नुसार सुकेश चंद्रशेखरवर गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी ईडीने जॅकलिन फर्नांडिसला आरोपी करत अलीकडेच न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केलं होतं.

या आरोपपत्राची दखल घेत न्यायालयाने जॅकलिनला २६ सप्टेंबर रोजी हजर राहण्यास सांगितले होते. २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी जॅकलिनला दोनदा चौकशीसाठी बोलावले आहे. मनी लॉंडरिंगप्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखरकडून जॅकलिनने कोट्यवधींच्या भेटवस्तू स्वीकारल्याचा आरोप तिच्यावर आहे. आरोपी सुकेश सध्या तिहार तुरुंगात आहे.

हेही वाचा :

उद्धव ठाकरेंची अवस्था पिसाळलेल्या कुत्र्यासारखी झाली आहे- निलेश राणे

या प्रकरणात जॅकलिनशिवाय नोहा फतेही आणि निक्की तांबोळीसह आणखी अभिनेत्रींचा समावेश आहे. दोन्ही अभिनेत्रींचीही चौकशी करण्यात आली आहे. २०० कोटी रुपयांच्या खंडणीचा आरोपी सुकेश चंद्रशेखर सध्या दिल्ली तुरुंगात बंद आहे आणि त्याच्यावर १० हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

सुकेशला सीरियल कॉनमॅन म्हणूनही ओळखले जाते. २०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या आरोपाखाली तिहार तुरुंगात बंद आहे. सुकेशवर फोर्टिस हेल्थकेअरचे प्रवर्तक शिविंदर मोहन सिंग यांची पत्नी अदिती सिंग आणि त्यांच्यासारख्या अनेक हाय प्रोफाइल महिलांसोबत फसवणूक केल्याचा आरोप आहे.

Shinde vs Thackeray SC Live : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर युक्तिवाद सुरू

याप्रकरणी हळूहळू अनेक खुलासे होत आहेत. ईडीच्या आरोपपत्रानुसार, सुकेशच्या वतीने जॅकलिनला महागड्या हिऱ्याच्या अंगठ्यांसह करोडो रुपयांच्या भेटवस्तू देण्यात आल्या होत्या. आलिशान गाड्यांचा समावेश आहे. नोरा फतेहीला सुकेशने एक महागडी कारही भेट दिली होती.

पिंकी नावाच्या महिलेमार्फत सुकेश त्यांना या भेटवस्तू द्यायचा. पिंकीनेच जॅकलिन फर्नांडिस आणि इतर अभिनेत्रींची सुकेशशी ओळख करून दिली. पिंकी टीव्ही शोची अँकर आहे आणि मनोरंजन क्षेत्रात तिची चांगली पकड आहे. अलीकडेच ईडीने पिंकी इराणीची चौकशी केली होती. ज्यामध्ये ती सुकेशसाठी मॉडेल्स आणि अभिनेत्रींशी संपर्क साधायची आणि त्यांना सुकेशला भेटायला किंवा फोनवर बोलायला सांगायची.

KBC 14 : नवरात्रीनिम्मित खेळाचे नियम बदलले

Exit mobile version