spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Video अभिनेत्री जुई गडकरीने मालिकेच्या एका सीनची केली पोलखोल, पहा हा व्हिडिओ

स्टार प्रवाहवर (Star pravah) नुकत्याच सुरु झालेल्या ‘ठरलं तर मग’ (Tharala Tar Mag) मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. या मालिकेतून अभिनेत्री जुई गडकरीने (Jui Gadkari) बऱ्याच काळानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. त्यामुळे तिचे चाहतेही तिला नव्या मालिकेत आणि नव्या भूमिकेत पाहून आनंदी आहेत. मालिकेला खऱ्या अर्थाने दिशा देणाऱ्या या दिग्दर्शकाविषयी वाटणारी आपुलकी आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी अभिनेत्री जुई गडकरीने एक अनोखा मार्ग शोधला आहे. तिने दिग्दर्शकासाठी खास भेट दिली आहे. अभिनेत्री जुई गडकरी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकतेच जुईनं ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या शूटिंग दरम्यान एक व्हिडिओ शेअर केला आहे.

हेही वाचा : 

New Year 2023 यंदा नव्या वर्षात करा आनंदी राहण्याचा अनोखा संकल्प !

मालिकेचे बरेच सीन हे आऊट दोरचे असतात. अनेकदा गाडीतले सीन दाखवण्यात येतात. त्यावेळी गाडीत अभिनेत्री आणि अभिनेत्यासोबत आणखी एक व्यक्ती असतो. जुईने एक व्हिडिओ शेअर करत तो व्यक्ती नेमका कुठे लपलेला असतो आणि काय करत असतो हे दाखवलं आहे. जुईने पोस्ट केलेल्या व्हिडिओत ती आणि मालिकेचा मुख्य अभिनेता गाडीच्या पुढच्या सीटवर बसलेला दिसत आहे. तर मालिकेचा सहाय्यक दिग्दर्शक पाठीमागच्या सीटच्या इथे पाय ठेवायला असलेल्या जागेत लपलेला दिसत आहे. हा व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत तिने लिहिलं, ‘जेव्हा आम्ही रिग माउंटेड सीन शूट करतो तेव्हा कारमध्ये नेहमीच तिसरी व्यक्ती असते. आमच्याकडे आमचे सहाय्यक दिग्दर्शक कार सीटच्या मागे अगदी लहान जागेत बसलेले आहेत. प्रत्येक दृश्यासाठी त्यांना खूप मेहनत घ्यावी लागते.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Jui Gadkari (@juigadkariofficial)

Uddhav Thackeray Live ‘मी कर्नाटकच्या मंत्र्यांना धन्यवाद देतो…’ उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांना चिमटा

दरम्यान, जुई गडकरी गेल्या बऱ्याच दिवसांपासून छोट्या पडद्यापासून दूर होती. अभिनेत्रीचे चाहते तिला प्रचंड मिस करत होते. तिला नव्या मालिकेमध्ये पाहण्यासाठी आतुर होते. आता जुईला नव्या व्यक्तीरेखेत पाहून चाहते आनंदी असून तिच्यावर आणि तिच्या विविध पोस्टवर चाहते खूप सारं प्रेम देत आहेत. जुई सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांसोबक कनेक्टेट असते.

विधानसभेत रंगला शेरोशायरीने माहोल, शिशे मे रहनेवाले घर मे कपडे नही बदला करता

Latest Posts

Don't Miss