spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अभिनेत्री केतकी माटेगावकरच्या चुलत भावाने केली आत्महत्या

सुप्रसिद्ध अभिनेत्री व गायिका केतकी माटेगावकरच्या चुलत भावाने पुण्यात राहत्या घरी आत्महत्या केली आहे.

सुप्रसिद्ध अभिनेत्री व गायिका केतकी माटेगावकरच्या चुलत भावाने पुण्यात राहत्या घरी आत्महत्या केली आहे. नोकरी लागत नसल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. तर आत्महत्या पूर्वी त्यांनी एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली होती. अक्षय माटेगावकर असे या तरुणाचे नाव. अवघ्या 21 वर्षाच्या वयात त्यांनी आपले प्राण दिले.

अक्षय सिम्बॉयसिस या महाविद्यालयात कम्प्युटर सायन्सच्या चौथ्या वर्षात शिक्षण घेत होता. सुसगाव येथील माउंट युनिअन सोसायटीच्या आठव्या मजल्यावर मित्रांसोबत तो राहायचा.अक्षयची आई मीनल माटेगावकर या मुंबईत प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. व अक्षय चे वडील अमोल माटेगावकर हे एका नामांकित कंपनीत मेकॅनिकल इंजिनिअर पदावर कार्यरत आहेत. व अक्षयची बहिण आकांक्षा माटेगावकर ही लोणी येथील एमआयटी विद्यालयात डिझायनिंग चे प्रशिक्षण घेत आहे. या माटेगावकर कुटुंबातील प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात व्यस्त असतानाही घटना घडवून कुटुंबातील सदस्यांना मोठा धक्का बसला.

माझ्या आयुष्यातील प्रत्येकाची मी माफी मागतो

“ही शेवटची गोष्ट असेल मी लिहतोय. माझ्याकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे, मी तुमची माफी मागतो. मी खूप प्रयत्न केले, पण मला ते जमले नाही. मी इंटर्नशिपमध्ये चांगली कामगिरी करण्याचा खूप प्रयत्न केला , पण तिथेही मी खराब झालो . हे पाहिल्यावर मला माहित आहे की मी नोकरी मिळवू शकत नाही आणि हे तुम्हाला सांगण्याचे धाडस माझ्यात नाही. शिवाय माझ्याकडे दुसरा कोणता पर्याय नाही. आई – बाबा आणि आकांक्षा, मला माफ करा. मी निघालो… तुमचा, अक्षय माटेगावकर” असे चिठ्ठीत म्हणत अक्षयने आपले प्राण दिले.

हेही वाचा : 

‘मंगळसूत्रावर’ मद्रास हायकोर्टानं केलं अजब मत व्यक्त

Latest Posts

Don't Miss