Actress पुनम इतकीच पलोमा आहे ग्लॅमरस and स्टायलिश

पूनम ढिल्लो त्यांच्या काळातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्यांनी १९७८ मध्ये मिस इंडिया हा किताब जिंकला होता. त्यांच्या सुंदरतेचे आजही लाखो चाहते आहेत. आज देखील लोक त्यांच्या सुंदरतेचे आणि अभिनयाचे भरभरून कौतुक करताना दिसतात.

Actress पुनम इतकीच पलोमा आहे ग्लॅमरस and स्टायलिश

पूनम ढिल्लो त्यांच्या काळातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्यांनी १९७८ मध्ये मिस इंडिया हा किताब जिंकला होता. त्यांच्या सुंदरतेचे आजही लाखो चाहते आहेत. आज देखील लोक त्यांच्या सुंदरतेचे आणि अभिनयाचे भरभरून कौतुक करताना दिसतात. सध्या त्या सिनेमात दिसत नाहीत पण आजही त्यांच्या चाहत्यांची काही कमी नाही. फिल्मी जगतापासून त्या जरी लांब असल्या करी नेहमीच लाईमलाईटमध्ये असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या नेहमीच चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असतात. पूनम या त्यांच्या प्रोफेशनल लाईफमुळे नेहमीच चर्चेत असतात पण पर्सनल लाईफमुळे देखील त्या नेहमीच चर्चेत असतात. त्यांची मुलगी देखील त्यांच्या एतकीच(Poonam Dhillon Daughter) सुंदर आहे.

पूनम यांच्या मुलीचं नाव पलोमा ढिल्लों आहे. ती या झगमगाटीच्या जगापासून नेहमीच लांब राहणं पसंत करते. आज आपण पूनम यांच्या याच मुलीविषयी जाणून घेणार आहे. पलोमा आई एतकीच सुंदर आहे आणि एखाद्या मॉडेलपेक्षा कमी नाही. तिचा फिटनेस आणि सौंदर्याच्या बाबतीत तिच्या आईला देखील मागे टाकताना दिसते. बाबतीत ती सगळ्यांना वेड लावू शकते. पलोमाने तिचे सोशल मीडिया अकाऊंट प्रायव्हेट ठेवले आहे, पण तिची आई म्हणजेच पूनम या अनेकदा चाहत्यांना आपल्या मुलीची झलक दाखवत असतात.२७ वर्षाची पलोमा खूपच ग्लॅमरस आणि स्टायलिश आहे.

सोशल मीडियावर पूनम या लाडक्या लेकीचे स्टाईलिश व्हिडिओ आणि फोटो शेअर करताना दिसतात. नेटकरी देखील कमेंट करत तिचं कौतुक करताना दिसतात. मागच्या काही दिवसापूर्वी पलोमाच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा रंगली होती, ज्यामध्ये सूरज बडजात्या यांचं प्रॉडक्शन हाऊस ‘राजश्री प्रॉडक्शन’ पलोमाला लाँच करण्यासाठी तयार असल्याचे बोलले जात होते. मात्र याबाबत अद्याप कोणतेही अपडेट समोर आलेले नाही.पूनम ढिल्लो यांच्याबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी १९७८ मध्ये ‘त्रिशूल’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर ती काला पत्थर, नूरी, सोहनी महिवाल, तेरी मेहरबानियां, कसम, समुंदर, नाम यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकली.दरम्यान, अभिनेत्रीने १९८८मध्ये चित्रपट निर्माते अशोक ठाकेरिया यांच्याशी लग्न केले, जे १० वर्षेदेखील टिकले नाही. १९९७ मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. या जोडप्याला पलोमा आणि अनमोल ही दोन मुले आहेत, जी अजूनही सिनेसृष्टीपासून दूर आहेत.

हे ही वाचा : 

जावई केएल राहुलच्या करियरमधील खराब काळाबद्दल बोलले सासरे सुनील शेट्टी

बाहुबली फेम कटप्पाच्या मुलीच्या सौंदर्याची तारीफ…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version