spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Tunisha Sharma तुनिषा शर्मा प्रेग्नंट होती, बॉयफ्रेंड शिझानने लग्नाला दिला नकार, ‘या’ टीव्ही अभिनेत्रीचा दावा

TV अभिनेत्री तुनिषा शर्माच्या मृत्यूवर अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणी तुनिषा शर्माचा सहकलाकार शिझान मोहम्मद खान (Shizan Mohammad Khan) याला अटक करण्यात आली आहे. शिझानला आज मुंबईतील वसई न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरणातील एफआयआरमधून मोठा खुलासा समोर आला आहे. एफआयआर कॉपीनुसार, तुनिषा आणि शिझान यांच्यात प्रेमसंबंध होते. यानंतर शिझानसोबत ब्रेकअप झाल्यामुळे तुनिषा डिप्रेशनमध्ये होती. आणि आता तुनिषा प्रेग्नंट असलायचा दावा टीव्ही अभिनेत्रीने केला आहे.

हेही वाचा : 

BAN vs IND श्रेयस अय्यरची धुवाधार खेळी पाहून अनोख्या पद्धतीने विराट कोहलीने केला आनंद व्यक्त

एबीपी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना ‘मॅडम सर’ फेम प्रीती तनेजा हिने दावा केला आहे की, तुनिषा आणि शिझान खूप जवळ होते. तुनिशाला शिझानशी लग्न करायचे होते, पण शिझानने लग्नास स्पष्ट नकार दिला. एवढेच नाही तर प्रीतीने तुनिषा आई होणार असल्याचेही सांगितले. त्यामुळे तिला शिझानशी लग्न करायचे होते, पण शीजन वारंवार लग्नास नकार देत होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tunisha Sharma (@_tunisha.sharma_)

‘अली बाबा दास्तान-ए-काबुल’ या टीव्ही शोमध्ये एकत्र काम करत असताना तुनिशा आणि शिझान एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, रिपोर्ट्सनुसार, शिझानचे काही काळापूर्वी तुनिशासोबत ब्रेकअप झाले होते. ब्रेकअपनंतर ती डिप्रेशनमध्ये राहू लागली. २४ डिसेंबर २०२२ रोजी आत्महत्या करण्यापूर्वी ती शिझानच्या मेकअप रूममध्येही गेली होती. यानंतर त्यांनी मृत्यूला कवटाळले होते.

Team Indiaने भारतीय क्रिकेट चाहत्यांना Christmas निमित्त दिली खास भेट, २-० ने मालिका जिंकत केला बांग्लादेशचा पराभव

यानंतर आता तुनिषाच्या कुटुंबियांनी शिझानवर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आज त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. तुनिशाला आत्महत्येस (Tunisha Sharma Death) प्रवृत्त केल्याचा आरोप अभिनेत्यावर करण्यात आला आहे. तुनिषाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन आज सकाळी जेजे रुग्णालयात करण्यात आले आहे.

Latest Posts

Don't Miss