spot_img
Wednesday, September 18, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अभिनेत्री प्रिया बापटने सिरीज ‘रात जवां है’मधील तिची लक्षवेधक भूमिका रचण्‍याचे श्रेय दिले दिग्‍दर्शक व लेखकांना…

सोनी लिव्‍हने नुकतेच सिरीज ‘राज जवां है'चा ट्रेलर लाँच केला आणि प्रेक्षकांकडून सुरूवातीला मिळालेला प्रतिसाद अत्‍यंत उत्‍स्‍फूर्त आहे.

सोनी लिव्‍हने नुकतेच सिरीज ‘राज जवां है’चा ट्रेलर लाँच केला आणि प्रेक्षकांकडून सुरूवातीला मिळालेला प्रतिसाद अत्‍यंत उत्‍स्‍फूर्त आहे. तसेच सिरीजमधील कलाकारांचे (प्रिया बापट, बरूण सोबती आणि अंजली आनंद) त्‍यांच्‍या परफॉर्मन्‍ससाठी कौतुक करण्‍यात आले आहे. या सिरीजमध्‍ये सुमनची भूमिका साकारणारी प्रिया बापट हा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद आणि तिला सतत मिळत असलेले कौतुक पाहून भारावून गेली आहे.

सिरीजच्‍या या ट्रेलरमधून तिची परिवर्तनात्‍मक भूमिका दिसून आली आहे, तसेच प्रेक्षकांना या सिरीजच्‍या उत्तम कथानकाची लक्षवेधक झलक देखील पाहायला मिळते. सिरीजचे कथ्‍कानक तीन जिवलग मित्र – राधिका (अंजली आनंद), अविनाश (बरूण सोबती) आणि सुमन (प्रिया बापट) यांच्‍या अनपेक्षित जीवनाला सादर करते, जेथे ते सर्वात रोमांचक प्रवासाची सुरूवात करतात, ते म्‍हणजे तान्‍ह्या मुलांचे संगोपन. सुमनची भूमिका साकारण्‍याच्‍या अनुभवाबाबत सांगताना अभिनेत्री प्रिया बापट म्‍हणाल्‍या, “कथानकाने प्रबळ पाया रचला असला तरी सुमीत व्‍यास (दिग्‍दर्शक) आणि ख्‍याती आनंद-पुथरन (लेखक व निर्माते) यांचे माहितीपूर्ण मार्गदर्शन मोलाचे ठरले, ज्‍यामुळे माझी भूमिका सुमनला आकार मिळाला. त्‍यांचे दिग्‍दर्शन व लेखनामुळे मला सुमनच्‍या भूमिकेमधील भावनिकतेबाबतच्या बारकाव्‍यांचा शोध घेण्‍यास व आत्‍मसात करण्‍यास मदत झाली. त्‍यांच्‍या पाठिंब्‍यामुळे मी या भूमिकेच्‍या आत्‍मनिरीक्षणशील व संघर्षाची सवय नसलेल्या स्‍वभावाला वास्‍तविकपणे सादर करू शकले.”

यामिनी पिक्‍चर्स प्रा. लि. द्वारे निर्मित सिरीज ‘राज जवां है’चे लेखन व निर्मिती ख्‍याती आनंद – पुथरन यांनी केले आहे आणि अत्‍यंत प्रतिभावान सुमीत व्‍यास यांनी दिग्‍दर्शन केले आहे. तसेच या सिरीजचे निर्माते विकी विजय आहेत. या कॉमेडी-ड्रामामध्‍ये प्रतिभावान स्‍टार कलाकार आहेत. ‘रात जवां है’ पाहण्यास पर्वणी अशी सिरीज आहे, ज्‍यामध्‍ये हसवून-हसवून लोटपोट करणारे क्षण, हृदयस्‍पर्शी सीन्‍सचा समावेश आहे. तर मग, ‘रात जवां है’सह पालकत्‍वाचा रोमांचक प्रवास पाहण्‍यासाठी सज्‍ज राहा आणि पहा सिरीज ११ ऑक्‍टोबरपासून फक्‍त सोनी लिव्‍हवर!

हे ही वाचा:

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी महावाचन उत्सवाचे आयोजन, उत्सवाचे ब्रँड ॲम्बेसिडर Amitabh Bachchan

मरिन लाईन ते वांद्रे सी लिंक हा प्रवास 10 मिनिटात पूर्ण होणार, धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प ठरणार गेमचेंजर

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss