spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘रंजना अन्फोल्ड’ अभिनेत्री रंजनाचा रंजक जीवनपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मराठमोळी अभिनेत्री रंजना म्हणजेच रंजना देशमुख ह्या जरी आता आपल्यात नसल्या तरी त्याचा अभिनय कायम लक्षात राहण्यासारखा होता. रंजना यांनी आपल्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत एक ठसा उमटवला होता. देखणा चेहरा, अभिनयातील विविधता, सुरेख संवादशैली आणि मनमोहक नृत्याच्या बळावर रंजना यांनी एक काळ गाजवत प्रेक्षकांवर जणू आपल्या सौंदर्याची मोहिनीच केली होती. ‘बिनकामाचा नवरा’, ‘मुंबईचा फौजदार’, ‘असला नवरा नको ग बाई’, ‘सासू वरचढ जावई’, ‘गुपचूप गुपचूप’ असे अनेक दर्जेदार चित्रपट त्यांनी केले. त्या आता आपल्या असत्या तरी नक्कीच त्यांच्या या चित्रपातील अभिनयामुळे उत्कृष्ठ अभिनेत्री पुरस्काराच्या मानकरी त्या ठरल्या असत्या. परंतु त्यांच्या अकाली निधनाने त्या आपल्यातून गेल्या आणि त्यांची जागा कायमची रिकामी झाली. पण आता त्यांच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या होणार आहेत. कारण रंजना यांच्या जीवनावर एक चित्रपट येत आहे.

कार्निवल मोशन पिक्चरने नुकतीच याची मोठी घोषणा केली. ‘रंजना अनफोल्ड’ असे या चित्रपटाचे नाव असणार आहे. चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन अभिजीत मोहन वारंग यांनी केले आहे. तर कार्निवल आणि आणि वैशाली सरवणकर यांची निर्मिती आहे. कार्निवल मोशन पिक्चरने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक विडिओ शेयर केली असून त्यामध्ये रंजना यांची झलक दिसते आहे. याशिवाय रंजना यांचे एक अजरामर गाणे ‘पाहिले न मी तुला..’ या विडिओला आहे. “लवकरच येत आहे आपणा सर्वांची लाडकी रंजना आपल्या भेटीला ३ मार्च २०२३ रोजी चित्रपटगृहात”, असे लिहिले आहे. रंजना यांची भूमिका कोण साकारणार आहे? याचा खुलासा अजून झालेला नाही. या चित्रपटात रंजना यांच्या कोणत्या आठवणी पाहायला मिळणार याची उत्कंठा प्रेक्षकांना आहे.

हेही वाचा : 

दिल्ली दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांची मंत्रिमंडळ विस्ताराविषयी पहिली प्रतिक्रिया

Latest Posts

Don't Miss